IND vs NZ : सेमी फायनल सामन्याआधी मुंबई पोलिसांना सर्वांना महत्त्वाच्या सूचना, स्टेडियममध्ये या गोष्टींवर बंदी

IND vs NZ : वर्ल्ड कपमधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडेमध्ये हा सामना पार पडणार असून त्याआधी मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. नेमक्या काय सूचना आहेत ते जाणून घ्या.

IND vs NZ : सेमी फायनल सामन्याआधी मुंबई पोलिसांना सर्वांना महत्त्वाच्या सूचना, स्टेडियममध्ये या गोष्टींवर बंदी
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 10:12 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023मधील भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज पहिला सेमी फायनल सामना आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. फायनलचं तिकीट पक्क करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्याआधी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असून प्रेक्षकांसाठी चांगली सोय केली आहे. पण पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. पोलिसांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताना काही गोष्टींवर बंदी घातली आहे. त्यामुळे तुम्ही सामना पाहायला जात असाल तर या गोष्टी बाहेर ठेवून जा.

स्टेडियममध्ये या गोष्टींवर असणार बंदी

या सामन्यासाठी सात पोलीस उपायुक्त तसेच 200 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्ता आहे. वानखेडे स्टेडियमच्या सर्व दहा गेट समोरील रस्त्यावर पार्किंगला मनाई केली आहे. एक किलोमीटरच्या परिघात पोलिसांनी केली पार्किंगची व्यवस्था केलीय. सुरक्षेच्या कारणास्तव पेन, पेन्सिल, मार्कर, कोरे कागद, बॅनर्स, पोस्टर्स तसेच बॅग, पॉवर बँक, नाणी तसेच ज्वलनशील पदार्थ, आधेपार्ह्य वस्तू तंबाखूजन्य पदार्थ न आणण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

गेल्या 3 दिवसापासून क्रिकेट प्रेमी रसिक हे देशभरातून हा सामना पाहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. काही क्रिकेट प्रेमींनी तर वर्ल्ड कपची प्रतिकृती आणि मोठी बॅट घेऊन हा सामना पाहण्यासाठी आले आहेत. भारतीय संघाकडे चांगली संधी असून मागील वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधीसुद्धा आहे.

वर्ल्ड कप साठी टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (C), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद . सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.