T20 World Cup 2024 आधी विश्वविजेता ऑस्ट्रेलिया अडचणीत, नक्की काय झालं?
Australia Cricket team: ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला आयपीएलमुळे टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेआधी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नक्की काय झालं? जाणून घ्या.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादला आयपीएलच्या 17 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात केकेआरने एसआरएचवर मात करत ट्रॉफी जिंकली. आयपीएल स्पर्धेतनंतर आता क्रिकेट विश्वाचं आणि चाहत्यांचं लक्ष हे टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेकडे लागून राहिलं आहे. या स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडे आहे. टीम इंडियाची पहिली तुकडी ही अमेरिकेत पोहचली आहे. तसेच इतर संघही आता दाखल होत आहेत.
साखळी फेरीआधी एकूण 20 संघांचे सराव सामने पार पडणार आहेत. त्याआधी ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. मिचेल मार्श याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे सराव सामन्यासाठी 11 खेळाडूही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला नाईलाज म्हणून सपोर्ट स्टाफमधील सदस्यांसह मैदानात उतरावं लागणार असल्याची चर्चा आहे.
ऑस्ट्रेलिया एकूण 2 सराव सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया बुधवारी नामिबिया आणि शुक्रवारी यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध भिडणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियाकडे सद्यस्थितीत 8 खेळाडू उपलब्ध आहेत. आयपीएल प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बहुतांश ऑस्ट्रेलियाचे खेळाडू होते. आता ते रवाना होतील. खेळाडूंची उपलब्धता नसल्याने ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया या पेचप्रसंगाचा कसा सामना करणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या अडचणीत वाढ
Australia could have only 8 players available for their warm-up match against Namibia due to a few IPL players getting rest.
– Australia may be forced to use support staff as substitute fielders. pic.twitter.com/KJOanzcxdR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 27, 2024
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), डेविड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, टीम डेविड, मार्कस स्टोयनिस, कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, एश्टन एगर, एडम झॅम्पा, पॅट कमिंस, जोश हेजलवुड, मिचेल स्टार्क आणि नाथन एलिस.
राखीव : जेक फ्रेजर – मॅकगर्ग आणि मॅट शॉर्ट.