SL vs IND: हातातला सामना जिंकण्यात अपयश! रोहितने काय म्हटलं?

Rohit Sharma SL vs IND 1st Odi: कॅप्टन रोहित शर्मा याने 56 धावा करुनही भारताला 231 धावा करण्यात अपयश आलं. सामना बरोबरीत सुटल्यांनतर रोहितने काय म्हटलं?

SL vs IND: हातातला सामना जिंकण्यात अपयश! रोहितने काय म्हटलं?
rohit sharma
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 11:27 PM

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेला टी 20 मालिकेत 3-0 अशा फरकाने क्लीन स्वीप दिला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना हा टाय झाला आहे. टीम इंडियाला श्रीलंकेने विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा याने 56 धावा करुनही भारताला हा सामना जिंकता आला नाही. टीम इंडियाला विजयासाठी 15 बॉलमध्ये हातात 2 विकेट्स असतानाही 1 धाव करता आली नाही. श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असलांका याने 48 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर 2 विकेट्स घेत टीम इंडियाला जिंकण्यापासून रोखलं. असालंका याने शिवम दुबे आणि त्यानंतर अर्शदीप सिंह या दोघांना बाद करत टीम इंडियाचं 47.5 ओव्हरमध्ये 230 धावांवर पॅकअप केलं. सामना अशाप्रकारे बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा खूप काही बोलला.

रोहितने काय म्हटलं?

“आव्हान पूर्ण करण्यासारखं होतं. मात्र टार्गेट पूर्ण करण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. आम्ही काही टप्प्यांमध्ये चांगले खेळलो, मात्र त्यात गती नव्हती. बॅटिंगने आम्ही चांगली सुरुवात केली. मात्र 10 ओव्हरनंतर फिरकी गोलंदाजांना मदत होईल हे माहित होतं. आम्ही आधी वरचढ होतो, मात्र पहिल्या 2 विकेट्स गमावल्यानंतर आम्ही मागे पडलो. त्यानतंर केएल राहुल आणि अक्षर पटेल या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे आम्ही कमबॅक केलं. मात्र शेवटी निराशा झाली. 14 बॉलमध्ये 1 धाव करता आली नाही. मात्र या गोष्टी घडतात”, असं रोहितने म्हटलं. केएल आणि अक्षर या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागदारी केली होती. त्यामुळे भारताच्या विजयाचा आशा कायम होत्या.

श्रीलंकेचं कौतुक आणि खंत

श्रीलंकेच्या कामगिरीचं कौतुक करत टीम इंडियाच्या लढाईचा अभिमान वाटतो, असं रोहितने म्हटलं. “श्रीलंका चांगला खेळला. आम्ही शेवटपर्यंत ज्या प्रकारे लढलो त्याचा अभिमान वाटतो. सामना जिंकण्याची संधी दोघांना होती. मात्र सामन्यात कायम राहणं महत्त्वाचं होतं. ती एक धाव आम्हाला मिळायला हवी होती”, असं म्हणत रोहितने खंत व्यक्त केली.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.