RCB vs LSG IPL 2023 : प्रवास करताना अनेकदा रस्त्यावर, हायवे वर बोर्ड लागलेले दिसतात. नजर हटली, दुर्घटना घडली, असा संदेश त्यावर लिहिलेला असतो. IPL 2023 च्या 15 व्या सामन्यात अशीच दुर्घटना घडली. आरसीबीसोबत ही दुर्घटना घडली. दिनेश कार्तिकने सावधानता बाळगली नाही. जाणून घ्या नेमकं काय घडलं? सोमवारी आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये लखनौने आरसीबीवर एक विकेटने विजय मिळवला.
सामना टाय करण्याची आरसीबीकडे एक चांगली संधी होती. पण दिनेश कार्तिक चेंडू नीट पकडू शकला नाही. त्यामुळे लखनौला विजय मिळाला.
घरच्या मैदानात अशी हरली RCB
लखनौच्या टीमला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 रन्स हवा होता. स्ट्राइकवर आवेश खान होता. हर्षल पटेलने आवेश खानला चकवलं. चेंडू विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या हातात गेला. त्या गडबडीच्या क्षणात दिनेश कार्तिक चेंडू नीट पकडू शकला नाही. चेंडू त्याच्या हातातून निसटला. नॉन स्ट्राइकवर रवी बिश्नोईने धाव पूर्ण केली. अशा प्रकारे आरसीबीचा आपल्याच घरात पराभव झाला.
दिनेश कार्तिकने काय चूक केली?
दिनेश कार्तिककडे आयपीएलच्या 232 सामन्याचा अनुभव आहे. पण दबावाखाली मोठ-मोठे खेळाडू बिथरतात. या खेळाडू सोबत असंच काहीस झालं. दिनेश कार्तिक दबावाखाली चेंडू नीट पकडू शकला नाही. घाईगबडीत त्याची नजर चेंडूवर नव्हती. त्यामुळे तो नीट चेंडू पकडू शकला नाही. त्याच नुकसान आरसीबीला सहन कराव लागलं.
Drama at the Chinnaswamy, a last-ball THRILLER ?#IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL #RCBvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/AIpR9Q4gFB
— JioCinema (@JioCinema) April 10, 2023
दिनेश कार्तिकपेक्षा पराभवाला आणखी कोण जबाबदार?
दिनेश कार्तिकपेक्षा आरसीबीचे गोलंदाज त्यांच्या पराभवाला जास्त कारणीभूत आहेत. 4 ओव्हरमध्ये लखनौच्या टीमने 23 रन्सवर 3 विकेट गमावले होते. मात्र त्यानंतर मार्कस स्टोयनिस आणि निकोलस पूरनने आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. आरसीबीचा एकही गोलंदाज या जोडीला रोखू शकला नाही. स्टॉयनिसने 30 चेंडूत 65 रन्स कुटल्या. निकोलस पूरनने 19 चेंडूत 62 धावांची तुफानी खेळी केली. दोघांनी मिळून 12 सिक्स आणि 9 फोर मारले.
धावा लुटवणारे आरसीबीचे दोन बॉलर
आरसीबीच्या गोलंदाजांबद्दल बोलायच झाल्यास, हर्षल पटेल आणि कर्ण शर्माने धावा देण्यात कुठलीही कसर सोडली नाही. हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 48 रन्स दिल्या. प्रतिओव्हर 12 रन्सचा इकॉनमी रेट होता. कर्ण शर्माने 3 ओव्हरमध्ये 48 रवन्स दिल्या. त्याचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर 16 रन्स होता.