IPL मध्ये विकेटकीपिंग सोडून ‘या’ तीन खेळाडूंनी केली गोलंदाजी, दुसऱ्या खेळाडूने मुंबईला बनवलंय चॅम्पिअन!
जगभर प्रसिद्ध असलेल्या या लीगमध्ये खेळाडू नेहमी काहीना काही वेगळं करून दाखवतात. त्यानंतर कित्येक खेळाडू हे ज्यामुळे त्यांनी आफली ओळख निर्माण केलेली असते त्याच्यापेक्षा वेगळं खेळ दाखवून देत सर्वांना विचार करण्यास भाग पाडतात. तुम्हाला माहित आहे का ३ असे कीपर ज्यांनी कीपिंग सोडून सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती.
मुंबई : आयपीलच्या १६ व्या हंगामाला सुरूवात झाली असून पहिल्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स संघाने पहिला विजय मिळवत स्पर्धेला सुरूवात केली आहे. जगभर प्रसिद्ध असलेल्या या लीगमध्ये खेळाडू नेहमी काहीना काही वेगळं करून दाखवतात. त्यानंतर कित्येक खेळाडू हे ज्यामुळे त्यांनी आफली ओळख निर्माण केलेली असते त्याच्यापेक्षा वेगळं खेळ दाखवून देत सर्वांना विचार करण्यास भाग पाडतात. तुम्हाला माहित आहे का ३ असे कीपर ज्यांनी कीपिंग सोडून सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती. असे ३ खेळाडू असून त्यामधील दोन खेळाडू हे भारतीय आहेत.
पहिला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट आहे. आपल्या बॅटींगसाठी आणि कीपिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या गिलख्रिस्टने आयपीएलमध्ये बॉलिंग केली आहे. सहाव्या मोसमामध्ये त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध गोलंदाजी केली होती. महत्त्वाचं म्हणजे त्याने १ विकेटही घेतली होती. हरभजन सिंगला त्याने आऊट केलं होतं. गिलख्रिस्टचा हा शेवटचा हंगाम होता.
दुसरा खेळाडू हा भारतीय असून दुसरा तिसरा कोणी नाहीतर अंबाती रायडू आहे. भारतीय संघामध्ये संधी न मिळणाऱ्या खेळाडूंपैकी रायडू एक आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून रायडू आता खेळत आहे. मुंबईकडून खेळताना त्याने कीपिंग केली होती मात्र त्याने एकदा बॉलिंगही केली होती. २०११ साली त्याने ३ ओव्हर टाकल्या होत्या त्यामध्ये त्याने २२ धावा दिल्या होत्या आणि विकेट मिळवण्यात तो यशस्वी ठरला नव्हता.
तिसरा खेळाडूसुद्धा भारतीय असून त्याचं नाव गुरकीरत सिंग आहे. गुरकीरतने अनेक सामन्यांमध्ये विकेटकीपिंग केली आहे. आयपीएलमध्ये एकूण 41 सामने खेळलेल्या गुरकीरतने ५ विकेट्स घेतल्या होत्या. २०१५ आणि २०१६ साली त्याने गोलंदाजी केली होती तर ५११ धावाही त्याने केल्या आहेत.