IPL Auction 2025 : अर्शदीप सिंगसाठी चेन्नई-दिल्लीने डाव लावला, काव्या मारननेही बोली लावली पण..

आयपीएल लिलावात पहिलं नाव भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचं आलं. खरं तर पंजाब किंग्सने त्याला रिलीज केलं होतं. त्यामुळे त्याला परत घेणार नाही अशीच शक्यता होती. पण काव्या मारनने 15 कोटी 75 बोली लावली. पण झालं असं की आरटीएम कार्ड वापरून काव्या मारनची बोली फेल ठरवली.

IPL Auction 2025 : अर्शदीप सिंगसाठी चेन्नई-दिल्लीने डाव लावला, काव्या मारननेही बोली लावली पण..
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 4:15 PM

आयपीएल मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये सुरु आहे. या लिलावात पहिलं नाव अर्शदीप सिंगचं आलं.पंजाब किंग्सने अर्शदीप सिंगला रिलीज केलं होतं. त्यामुळे त्याच्यासाठी पहिल्या सेटमध्येच बोली लागली. बेस प्राईस 2 कोटींपासून बोली लागण्यास सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बोली सुरु झाली. ठरावीक किंमतीपर्यंत पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने बोली सोडून दिली. त्यानंतर दिल्ली आणि गुजरात टायटन्स यांच्यात चढाओढ सुरु झाली.दिल्ली कॅपिटल्सने 10.75 कोटीपर्यंत बोली लावली आणि गुजरात टायटन्स या लिलावातून बाहेर पडली. पण राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादने बोली लावण्यास सुरुवात केली आणि दिल्ली कॅपिटल्स आऊट झाली.

सनरायझर्स हैदराबादने सर्वात मोठी बोली लावली. 15 कोटी 75 लाखांची बोली अर्शदीप सिंगला आपल्याकडे ओढलं. पण पंजाब किंग्स आपल्याकडे मोठी पर्स घेऊन बसली होती. त्यामुळे त्याला सहजासहजी सोडणार नव्हतं. मग काय आरटीएम कार्ड वापरलं आणि 18 कोटींची बोली लावली. अर्शदीप सिंगला 18 कोटी मिळाले आणि पंजाब किंग्ससोबत राहिला.

अर्शदीप सिंगने 2019 आयपीएलमधून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. अर्शदीप 65 आयपीएल सामने खेळला आहे. यात 1364 चेंडू टाकले असून 2052 धावा दिल्या आहेत. तसेच 76 विकेट घेतल्या आहेत. 32 धावांवर 5 विकेट ही सर्वोत्तम खेळी आहे. त्याचा इकोनॉमी रेट 9.03 आहे. दरम्यान फलंदाजीत 12 डावात खेळला आहे. त्याने एकूण 29 धावा केल्या असून 10 ही सर्वोत्तम खेळी आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.