IND vs AUS : आर. अश्विन याचं नशीब जोरात, आधी संघात संधी आणि आता गेलेली विकेट मिळाली Watch Video
IND vs AUS 1st ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेत आर अश्विनला संधी मिळाली आहे. या मालिकेतील कामगिरीवर वनडे वर्ल्डकपमधील स्थान निश्चित होणार आहे. सध्या त्याचं नशीब जोरात आहे असंच म्हणावं लागेल.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय कर्णधार केएल राहुल याने घेतला. पाटा विकेट असल्याने या खेळपट्टीवर आरामात स्कोअर चेस होईल, असा या निर्णयामागचा हेतू आहे. मोहम्मद शमीने अपेक्षित सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकात मिचेल मार्श याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. श्रेयस अय्यर याने वॉर्नरचा सोपा झेल सोडला. त्याने या संधीचा फायदा घेत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर लाबुशेनला रनआऊट करण्याची संधी केएल राहुल याने सोडली. दुसरीकडे, आर. अश्विन याचं या मालिकेत सर्वस्व पणाला लागलं आहे. मालिकेतील कामगिरीवर वनडे वर्ल्डकपमधील स्थान निश्चित होणार आहे. आर अश्विन विकेट मिळवण्यासाठी धडपडत असल्याचं दिसत आहे.
अखेर आर. अश्विनला मिळालं यश
रविचंद्रन अश्विनकडे मोठ्या आशेने पाहिलं जात आहे. अक्षर पटेल जखमी असल्याने त्याच्या ऐवजी वनडे वर्ल्डकप संघात स्थान मिळण्याची संधी आहे. पण पाटा विकेटवर आर. अश्विन विकेट मिळवण्यासाठी धडपडताना दिसला. 7 षटकं टाकल्यानंतर 39 धावा दिल्या आणि एकही विकेट हाती नव्हती. त्यामुळे विकेट घेण्याची धडपड सुरु होती. वैयक्तिक आठवं षटक टाकताना चौथ्या चेंडूवर यश मिळालं. पण हे यश देखील मिळणं वाटतं तितकं सोपं नव्हतं.
Brilliant stumping by Kl Rahul.
At least some Good work in field 👏#INDvsAUS #CricketWorldCup2023 #WorldCup2023 #Cricket #ICCWorldCup2023 pic.twitter.com/pv01GBmHDb
— king_kohli_FanClub (@RavindraNain29) September 22, 2023
I'm sure he meant it 😅
A bizzare stumping after KL Rahul fumbles it back onto the stumps to dismiss Marnus Labuschagne
📺Watch #INDvAUS on ch. 501 or stream via @kayosports: https://t.co/hD77t5wWeR✍️BLOG: https://t.co/LqFGDKB9Lp🔢MATCH CENTRE: https://t.co/D6lOGsPV6x pic.twitter.com/fa3HmVvbkz
— Fox Cricket (@FoxCricket) September 22, 2023
कर्णधार केएल राहुल याने हातातला चेंडू सोडला होता. पण अश्विनला नशिबाची साथ मिळाली. चेंडू खाली पडून थेट स्टंपवर आदळला. यामुळे लाबुशेन स्टंम्पिग होत तंबूत परतला. 20 महिन्यानंतर वनडे संघात स्थान मिळालेल्या अश्विनचं हे पहिलं यश आहे. अश्विनने 10 षटकात 47 धावा देऊन 1 गडी बाद केला.
दोन्ही संघांचे खेळाडू
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲडम झम्पा
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर) इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी