ODI World Cup 2023 Video : पत्रकार परिषदेत रोहित शर्मा याला असा प्रश्न विचारताच संतापला, स्पष्टच म्हणाला की…

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यानंतर रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले. तेव्हा पत्रकाराने एक प्रश्न विचारताच रोहित शर्मा चांगलाच संतापला.

ODI World Cup 2023 Video : पत्रकार परिषदेत रोहित शर्मा याला असा प्रश्न विचारताच संतापला, स्पष्टच म्हणाला की...
ODI World Cup 2023 : पत्रकाराने तसा प्रश्न विचारताच रोहित शर्मा याच्या तळपायाची आग मस्तकात, स्पष्टच सांगितलं...Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 3:30 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कप स्पर्धेत खेळत असलेले सर्व खेळाडू या संघात आहेत. फक्त तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना डावलण्यात आलं आहे. खेळाडूंच्या नावाची घोषणा केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले. यावेळी पत्रकारांनी टीम निवडीबाबत काही प्रश्न विचारले. तेव्हा रोहित आणि अजित आगरकर यांनी त्यांनी उत्तरं दिली. पण एका प्रश्नामुळे रोहित शर्मा चांगलाच संतापला. तसेच पत्रकारांना कडक शब्दात ताकीद दिली. असा प्रश्न पुन्हा विचारू नका असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.

पत्रकाराने रोहित शर्मा याला कोणता प्रश्न विचारला?

पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा याला ड्रेसिंग रुममधील वातावरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ड्रेसिंग रुममधून बाहेर ज्या बातम्या येतात त्याबद्दल तुझं काय मत आहे? यावर रोहित शर्मा चांगलाच संतापला. त्याने स्पष्टच सांगितलं की असा प्रश्न पुन्हा विचारू नका आणि विचारला तरी त्याचं उत्तर देणार नाही.

“मी आधीही सांगितलं आहे की, टीममधील खेळाडूंवर याचा काहीही परिणाम होत नाही. सर्व खेळाडूंनी हे पाहिलं आहे. जेव्हा भारतात वर्ल्डकप दरम्यान पत्रकार परिषद करेल तेव्हा ड्रेसिंग रुममधील वातावरणाबाबत विचारू नका. त्याचं उत्तर देणार नाही.याला काहीच अर्थ नाही. आमचं लक्ष्य दुसरीकडे आहे आणि आम्ही एक संघ म्हणून त्याकडे फोकस करत आहोत.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.

संघ निवडीवर रोहित शर्मा काय म्हणाला?

“आम्ही सर्वोत्तम खेळाडू निवडण्याचा प्रयत्न केला आहे. काही खेळाडूंना संधी मिळाली नाही आणि असंच होतं. ते निराश होतील. मी यातून गेलो आहे. त्यामुळे आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं. 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा याची संघात निवड झाली नव्हती.

वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.