AUS vs PAK Test : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाईट वॉश, मालिका 3-0 ने जिंकली

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धोबीपछाड दिला. ऑस्ट्रेलिया मालिका 3-0 ने खिशात घातली. पहिल्या डावात 14 धावांची आघाडी घेऊनही दुसऱ्या डावात पाकिस्तानचा डाव घसरला आणि ऑस्ट्रेलियाने तिसरा आणि शेवटचा सामना 8 गडी राखून जिंकला.

AUS vs PAK Test : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाईट वॉश, मालिका 3-0 ने जिंकली
AUS vs PAK Test : तिसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला धोबीपछाड, मालिकेत सुपडा साफ
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 8:29 AM

मुंबई : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धोबीपछाड दिला आहे. गेल्या 17 वर्षापासून पाकिस्तानला एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्याचाच कित्ता यंदाही गिरवला गेला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 3-0 ने धोबीपछाड दिला. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर व्हाईट वॉश दिला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पाकिस्तानने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या दिवशी सर्वबाद 313 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 299 धावा करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानकडे 14 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या फलंदाजांनी माती खाल्ली. पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या 115 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 130 धावांचं आव्हान देण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं. तसेच कसोटी कारकिर्दिच्या अंतिम सामन्यात डेविड वॉर्नरने 57 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून साजिद खानला दोन गडी बाद करण्यात यश आलं.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजाच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. साजिद खानने त्याला पायचीत करत तंबूत पाठवलं. त्यानंतर डेविड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन या जोडीने 119 धावांची भागीदारी केली. डेविड वॉर्नर 57 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ जोडीने विजयी धावसंख्या केल्या. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 8 गडी राखून विजय मिळवला.

पाकिस्तानला या पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होती. पण पराभवामुळे आता सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत फायदा झाला असून अव्वल स्थान गाठलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आघा सलमान, आमेर जमाल, साजिद खान, हसन अली, मीर हमजा

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...