IPL आधी मुंबई इंडियन्सची ताकद दुपटीने वाढली, नीता अंबानींनी खेळली मोठी चाल
Mumbai Indiance : आयपीएलआधी मुंबई संघाला कडक गोलंदाजाला संघात घेण्याची गरज आहे. नीता अंबानी यांनी एका स्टार खेळाडूला संघात घेत ताकद दुपटीने वाढवली आहे. कोण आहे ती खेळाडू जिच्यामुळे संघाची ताकद वाढली आहे जाणून घ्या.
मुंबई : आयपीएल 2024 सुरू होण्याआधी झालेल्या ट्रेडिंगमध्ये मुंबईने हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात घेत संघ आणखी मजबूत केला आहे. ट्रेडिंगनंतर आयपीएलचा लिलाव येत्या 19 डिसेंबरला पार पडणार आहे. त्याआधी आज वुमन्स प्रीमिअर लीगचा लिलाव झाला. यामध्ये मुंबई संघाने एका स्टार खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेत संघाची आणखी ताकद वाढवली आहे. कोण आहे ती स्टार खेळाडू ज्यामुळे मुंबईची ताकद वाढली आहे.
वुमन्स प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्स संघाने एका स्टार खेळाडूवर मजबूत पैसा ओतला. मुंबईने दक्षिण आफ्रिका संघाच्या शबनम इस्माईलसाठी सर्वाधिक पैसा खर्च केला होता. शबनम इस्माईलला खरेदी करण्यासाठी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. अखेर मुंबईने बाजी मारत शबनम इस्माईल हिला 1 कोटी 20 लाख रूपये खर्च केले.
शबनम ही वेगवान गोलंदाज असून मागील सीझनमध्ये ती यूपी वॉरियर्स संघाकडून खेळली होती. मात्र यूपीने तिला रीलिज करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने मात्र ही संधी न सोडता शबनम हिला आपल्या संघात सामील करून घेतलं. मुंबईची गोलंदाजी आणखी बळकट होणार आहे. शबनम इस्माईल हिने महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शबनमने 128 किमीने वेगाने चेंडू टाकला होता, मुंबईसाठी कदाचित मॅचविनरही ठरू शकते याचा सर्वात जास्त पश्चाताप हा युपी वॉरियर्स संघाला बसू शकतो.
#ProteaFire 🤝 Mumbai 🔥 We love this combination 💙
PS: Can’t wait for all the banter between Chloe and you 😂#OneFamily #AaliRe #TATAWPLAuction #WPLAuction pic.twitter.com/rnYWvg19px
— Mumbai Indians (@mipaltan) December 9, 2023
WPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ: हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हेली मॅथ्यूज, शबनम इस्माईल, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतीमनी कलिता, एस सजना, नताली स्कायव्हर, फातिमा जाफर, इशाक, यास्तिक , अमनदीप कौर, पूजा वस्त्रकार, कीर्तन बालकृष्णन, प्रियांका बाला.