चेन्नई : IPL 2023 संपल्यानंतर सध्या तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धा सुरु आहे. या लीगमध्ये एकापेक्षा एक सरस परफॉ़र्मन्स पाहायला मिळतायत. बुधवारी या सामन्यात असाच एक प्रसंग घडला, ज्यामुळे सूर्यकुमार यादवची आठवण आली. एनपीआर कॉलेज ग्राऊंडवर डिंडीगुल ड्रॅगन्स आणि चेपॉक सुपर गिल्लिसमध्ये सामना सुरु होता. डिंडीगुलकडून शरत कुमार बॅटिंग करत होता, त्यावेळी त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या आत्म्याने प्रवेश केलाय असं वाटलं.
या मॅचमध्ये डिंडीगुलने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 9 विकेट गमावून 170 धावा केल्या. भारतीय टेस्ट टीमचा सदस्य रविचंद्रन अश्विन डिंडीगुलचा कॅप्टन आहे. अलीकडे अश्विनला WTC फायनलच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती.
कसा मारला शॉट?
डिंडीगुलच्या इनिंगमध्ये 12 वी ओव्हर सुरु होती. बी रॉकी गोलंदाजी करत होता. रॉकीने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या शरतने चेंडूचा अंदाज बांधला. तो ऑफ स्टम्पच्या बाहेर गेला. त्याचा एक पाय पीचच्या बाहेर होता. त्याने गुड़घ्यावर बसून फाइन लेगच्यावरुन शॉट मारला. पण हा फटका खेळतानात त्याचं संतुलन ढासळलं. तो जमिनीवरच झोपला. या चेंडूवर चौकार गेला.
Tough knock at a Tough time!??#TNPL2023?#csgvsdd#TNPLonstarsports#TNPLonfancode#NammaAatamAarambam?#NammaOoruNammaGethu?? pic.twitter.com/tN8h7P2Wrd
— TNPL (@TNPremierLeague) June 21, 2023
सूर्यकुमार असे शॉट्स सहज मारतो
सूर्यकुमार यादव सुद्धा असेच शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये सूर्यकुमार कित्येकदा अशा प्रकारचा शॉट खेळलाय. आयपीएलच नाही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सूर्यकुमार असे शॉट्स मारतो. महत्वाच म्हणजे सूर्यकुमार खूप सहजतेने असे फटके खेळू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिविलियर्स अशा प्रकारची फलंदाजी करायचा. त्यामुळे डिविलियर्ससारखच सूर्यकुमारला मिस्टर 360 म्हटलं जातं.
Guarding your stumps is too mainstream in T20 cricket ?#TNPLonFanCode #TNPL2023 pic.twitter.com/9CfbipOJkh
— FanCode (@FanCode) June 21, 2023
डिंडीगुलच्या इनिंगमध्ये आदित्य गणेशने सर्वाधिक 44 धावा केल्या. सुबोध भाटीने 13 चेंडूत 31 धावा फटकावल्या. शरतने 21 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. या तिघांशिवाय शिवम सिंह 21 आणि राहुलने 20 धावा केल्या.