युवराज सिंगच्या ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंना स्थान, भारताचे तीन प्लेयर्स पण धोनीला डावललं

युवराज सिंगच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स चषकावर नाव कोरलं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला अंतिम सामन्यात 5 विकेट्स राखून पराभूत केलं. त्यानंतर युवराज सिंगने एका मुलाखतीत ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनबाबात सांगितलं. यात त्याने तीन भारतीय खेळाडूंना स्थान दिलं.

युवराज सिंगच्या ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंना स्थान, भारताचे तीन प्लेयर्स पण धोनीला डावललं
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 6:02 PM

युवराज सिंग हे भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाव..टी20 वर्ल्डकप 2007 आणि वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या खेळीमुळेच टीम इंडियाचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आता त्याच्या नेतृत्वात पुन्हा एकदा टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 20 षटकात 6 गडी गमवून 156 धावा केल्या आणि विजयासाठी 157 धावा दिल्या. भारताने हे आव्हान 19.1 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात युवराज सिंग नाबाद 15 धावांवर राहिला. या विजयानंतर बर्मिंगहॅममध्ये युवराज सिंग याला एका मुलाखतीत ऑल टाइम प्लेइंग इलेव्हनबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने या प्रश्नाचं आपल्या उत्तर देत तीन भारतीयांना स्थान दिलं. त्यााच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं.

युवराज सिंगने प्लेइंग इलेव्हनबाबत सांगताना पहिलं नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं घेतलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग, हिटमॅट रोहित शर्मा, रनमशिन विराट कोहली, 360 नावाने प्रसिद्ध असलेला एबी डीव्हिलियर्स यांची नावं घेतली. तर विकेटकीपर बॅट्समन म्हणून अॅडम गिलख्रिस्ट याला स्थान दिलं. फिरकीची जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यांच्या खांद्यावर दिली. वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्ग्रा, पाकिस्तानचा वसीम अक्रम यांना स्थान दिलं. तर अष्टपैलू म्हणून इंग्लंडच्या अँड्र्यूज फ्लिंटॉफ याला घेतलं. तर स्वत:ची निवड 12 वा खेळाडू म्हणून केली.

युवराज सिंगने ऑल टाईम प्लेइंग इलेव्हनमद्ये तीन भारतीयांची नावं घेतली. पण महेंद्रसिंह धोनीला यात स्थान मिळालं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओखाली संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांच्या मते अॅडम गिलख्रिस्ट ऐवजी धोनीला स्थान मिळू शकतं. तर काही जणांच्या मते युवराजने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनला चॅलेंज करणं खूपच कठीण आहे. कारण सर्वच दिग्गज खेळाडू आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.