भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने कंबर कसली, आक्रमक खेळाडूसह संघाची केली घोषणा
बॉर्डर गावस्कर स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या आधी भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघ यांच्या दोन 4 दिवसीय कसोटी मालिका होणार आहे.
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेकडे क्रीडारसिकांचं लक्ष लागून आहे. ही कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पण या आधी भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघ आमनेसामने येणार आहेत. उभय देशांमध्ये 4 दिवसीय कसोटी सामने होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 31 ऑक्टोबरपासून खेळवला जाणारा आहे. दुसरा कसोटी सामना 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम ऑस्ट्रेलियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात युवा आणि वरिष्ठ खेळाडूंची सांगड घालण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करणाऱ्या स्कॉट बोलंडलाही संघात स्थान दिलं आहे.
वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड ऑस्ट्रेलियाकडून 2023 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याने भारतीय संघाला अडचणीत आणलं होतं. पहिल्या डावात दोन विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात शुबमन गिल, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना तंबूत पाठवलं होतं. ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात बोलंडचा महत्त्वाचा वाटा होता.
ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली असली तरी बीसीसीआयने अजून भारत ए संघाची घोषणा केलेली नाही. पण भारत ए संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे दिले जाऊ शकते, असे वृत्त आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, गायकवाड याच्याकडे भारत ए संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यासह रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही भारत ए संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. या संघात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विचार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे दोन सामन्यांची कसोटी मालिका महत्त्वाची आहे.
ऑस्ट्रेलिया ए संघ : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, स्कॉट बोलंड, जॉर्डन बकिंगहॅम, कूपर कॉनोली, ऑली डेव्हिस, मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, नॅथन मॅकअँड्र्यू, मायकेल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ’नील, जिमी रॉकस्टेरी, सेंट विक्स्टरी.