‘विराट आणि मी सोडलो तर…’,10 विकेट्सच्या पराभवानंतर रोहित शर्मा याने कोणाला पकडलं जबाबदार!

एकट्या स्टार्क याने 5 विकेट्स घेत टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करून टाकली. प्रमुख फलंदाजांनीही स्टार्कसमोर अक्षरक्ष: लोटांगण घातलं. सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया देताना परभवाचं कारण सांगितलं आहे.

'विराट आणि मी सोडलो तर...',10 विकेट्सच्या पराभवानंतर रोहित शर्मा याने कोणाला पकडलं जबाबदार!
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 11:25 PM

मुंंबई : ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 10 गडी राखून पराभव केला. आजच्या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला तो मिचेल स्टार्क. एकट्या स्टार्क याने 5 विकेट्स घेत टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करून टाकली. प्रमुख फलंदाजांनीही स्टार्कसमोर अक्षरक्ष: लोटांगण घातलं. सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया देताना परभवाचं कारण सांगितलं आहे.

सामना गमावल्यानंतर निराशा येतेच, सामन्यामध्ये फलंदाज कमी पडले कारण ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती. आम्ही धावा काढण्यामध्ये अपयशी ठरलोत आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी धावा काढण्याची संधीही दिली नाही. शुबमन बाद झाल्यानंतर विराट आणि मी 30 ते 35 धावा केल्या होत्या मात्र त्यानंतर माझी विकेट गमावली आणि पुढे मोठी भागीदारी झाली नसल्याचं, असं रोहित शर्मा म्हणाला. स्टार्क एक उत्तम गोलंदाज आहे. नव्या चेंडूने तो घातक गोलंदाजी करतो त्याच्यासमोर आम्ही अपयशी ठरलो असून आता आम्ही हे सर्व समजून घेऊन त्यानुसार खेळ करणार असल्याचंही रोहित शर्माने सांगितलं.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अवघ्या 11 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीनेच विजय मिळवून दिला. या दोघांनी 121 धावांची नाबाद भागीदारी केली. मिचेल मार्श याने नाबाद 66 आणि ट्रेव्हिस हेड याने नाबाद 51 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा घेतला. तसेच 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

दरम्यान आता 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणारी टीम मालिका जिंकेल.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस स्टोयनिस, नाथन एलिस, सेन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.