IND vs AFG 1st T20I | मोहम्मद नबीची तडाखेदार खेळी, टीम इंडियाला 159 धावांचं आव्हान
India vs Afghanistan 1st T20i | अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मोहम्मद नबी याने अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला 150 पार जाता आलं.
मोहाली | मोहम्मद नबीच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्तान क्रिकेट टीमन पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी याने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर टॉप ऑर्डरमधील पहिल्या तिघांनी 20 पेक्षा अधिक धावा करत आश्वासक सुरुवात करुन दिली. तर टीम इंडियाकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेल या दोघांनी सर्वाधिक 2-2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रहमानुल्लाह गुरबाज आणि कॅप्टन इब्राहीम झद्रान या सलामी जोडीने अफगाणिस्तानला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यांतर रहमानुल्लाह गुरुबाज याला अक्षर पटेल याने विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती स्टपिंग आऊट केलं. गुरुबाज 23 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर 50 धावांवर अफगाणिस्तानने दुसरी विकेट गमावली. शिवम दुबे याने आपल्या स्पेलमधील दुसऱ्याच बॉलवर इब्राहीम झद्रान याला 25 धावांवर आऊट केलं. डेब्युटंट रहमत शाह 3 धावा करुन मैदानाबाहेर परतला.रमहतला अक्षर पटेल याने क्लिन बोल्ड केलं.
त्यानंतर अझमतुल्लाह आणि मोहम्मद नबी या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची निर्णायक भागीदारी केली. या दरम्यान नबीने जोरदार फटकेबाजी केली. मात्र 125 स्कोअर असताना अझमतुल्लाह 29 धावांवर आऊट झाला. मुकेश कुमारने अझमतुल्लाहच्या दांड्या उडवल्या. अझमतुल्लाहनंतर मोहम्मद नबीही आऊट झाला. नबीने 27 बॉलमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावांची विस्फोटक खेळी केली. तर नजीबुल्लाह आणि करीम जनात ही जोडी अनुक्रमे 19 आणि 9 धावा करुन नाबाद परतली. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल या दोघांव्यतिरिक्त शिवम दुबे याला एकमेव विकेट मिळाली.
टीम इंडियाासमोर 159 धावांचं आव्हान
Innings Break!
Afghanistan post 158/5 on the board.
2⃣ wickets each for @akshar2026 & Mukesh Kumar 1⃣ wicket for Shivam Dube
Over to our batters now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/BkCq71Zm6G#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/E9Nnsn6Xx4
— BCCI (@BCCI) January 11, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज(विकेटकीपर), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.