IND vs AFG 1st T20i Toss | टीम इंडियाने टॉस जिंकला, अफगाणिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
India vs Afghanistan 1st T20I Toss | टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. रोहित शर्माने प्लेईंग ईलेव्हमध्ये कोणाला संधी दिली आहे? पाहा.
मोहाली | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचं आयोजन हे पंजाब क्रिकेट असोसिशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडला. नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
प्लेईंग ईलेव्हनमध्ये ही चौकडी नाही
या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहेत, असा प्रश्न रोहितला टॉस झाल्यानंतर विचारण्यात आला. तेव्हा रोहित म्हणाला की “संजू सॅमसन, आवेश खान, यशस्वी जयस्वाल आणि कुलदीप यादव या चौघांचा समावेश नाही.” प्लेईंग ईलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून अमरावतीच्या जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे. तर यशस्वी जयस्वाल याला दुखापत झाली आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत शुबमन गिल ओपनिंगला येणार आहे.
टॉसनंतर अफगाणिस्तानचा कॅप्टन काय म्हणाला?
“आम्हाला पण पहिले बॉलिंग करायची होती. मात्र आम्ही रणनितीनुसार खेळ करण्याचा प्रयत्न करु. आगामी टी 20 वर्ल्ड कप पूर्वी ही मालिका अनुभवात भर पाडणारी आहे. आम्ही सकारात्मक खेळण्याचा प्रयत्न करु. नूर अहमद, शराफुद्दीन आणि सलीम सैफी हे तिघे खेळणार नाहीत”, असं टॉसनंतर अफगाणिस्तानचा कॅप्टन इब्राहिम झद्रान म्हणाला.
टीम इंडियाने टॉस जिंकला
🚨 TOSS ALERT 🚨
India won the toss and opted to bowl in the first T20I against Afghanistan! 👍#AfghanAtalan | #INDvAFG2024 | @LavaMobile | @EtisalatAf | @IntexBrand pic.twitter.com/34x5Ju0PQt
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 11, 2024
हेड टु हेड रेकॉर्ड
दरम्यान आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकूण 5 टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाचाच वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 1 सामन्याचा निकाला लागला नाही.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन| रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज(विकेटकीपर), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.