इंदूर | अफगाणिस्तान विरुद्ध मोहालीतील पहिला टी 20 सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया इंदूरमध्ये मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. रोहितसेना 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी 20 सामना हा मध्य प्रदेशमधील इंदूर येथे संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे.
दुसऱ्या टी 20 सामन्यातून टीम इंडियात विराट कोहली याची एन्ट्री होणार आहे. विराट वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. विराट दुसऱ्या सामन्यासाठी इंदूरला पोहचला आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीचं टी 20 क्रिकेटमध्ये 14 महिन्यांनी कमबॅक झालं आहे. रोहित शर्मा पहिल्या टी 20 सामन्यात रन आऊट झाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात या जोडीकडून तडाखेदार खेळीची अपेक्षा असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात ही पहिलीच टी 20 मालिका होत आहे. आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकूण 6 टी 20 सामने झाले आहेत. या 6 पैकी 5 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.
रोहित शर्मा-विराट कोहली जोडी 14 महिन्यांनी पुन्हा एकत्र
Reunion of Hitman & King in T20I after 14 long months. 🇮🇳 pic.twitter.com/fQOyasnsxB
— Johns. (@CricCrazyJohns) January 13, 2024
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव, आवेश खान
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), अजमतुल्ला ओमरझई, रहमत शाह, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, गुलबद्दीन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, हजरतुल्ला झझाई, फरीद अहमद मलिक, शराफुद्दीन अश्रफ, इकराम अलीखिल, कैस अहमद, नूर अहमद आणि मोहम्मद सलीम साफी.