IND vs AFG 2nd T20i | यशस्वी-शिवमची अर्धशतकी खेळी, टीम इंडियाचा सामन्यासह मालिका विजय
India vs Afghanistan 2nd T20i Highlights | टीम इंडियाने दुसरा सामना आणि मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध पहिली टी 20 मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.

इंदूर | टीम इंडियाने अफगाणिस्तानवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे ही मुंबईकर जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. टीम इंडियाने या विजयासह ही मालिकाही जिंकली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
विजयी धावांच्या पाठलागासाठी मैदानात आलेल्या टीम इंडियाची अपेक्षित सुरुवात झाली नाही. रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यातही झिरोवर आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 28 बॉलमध्ये 57 धावांची खेळी केली. विराट 29 धावा करुन माघारी परतला. विराटनंतर मुंबईकर ऑलराउंडर शिवम दुबे मैदानात आला.
शिवम आणि यशस्वीची 97 धावांची भागीदारी
शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी टीम इंडियाचा विजय निश्चित केला. या दोघांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना बॅटने झोडून काढलं. या दरम्यान यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या दोघांना वैयक्तिक अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 44 बॉलमध्ये 97 धावांची मोठी भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी 68 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर आलेला जितेश शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर शिवम दुबे आणि रिंकू सिंह या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. रिंकू नेहमीप्रमाणे यंदाही नाबाद राहिला. रिंकूने 9 धावा केल्या. तर शिवम 63 धावा करुन नाबाद परतला. तर अफगाणिस्तानकडून करीम जनात याने 2 विकेट्स घेतल्या. तर फझलहक फारुकी आणि नवीन उल हक या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाने मालिका जिंकली
Jaiswal, Dube star in the run-chase as India take an unassailable 2-0 lead in the series 🌟#INDvAFG 📝: https://t.co/sjDyeKwWuE pic.twitter.com/L7Z5Syrd8l
— ICC (@ICC) January 14, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.