बंगळुरु | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील पहिली सुपर ओव्हरही टाय झाली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियाला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 17 धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्माने 2 सिक्स मारुन टीम इंडियाचा विजय सोपा केला होता. मात्र रोहित त्यानंतर मैदानाबाहेर गेला. त्यानंतर रिंकू सिंह मैदानात आला. टीम इंडियाला विजयाासाठी शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. यशस्वी जयस्वाल स्ट्राईकवर होता. मात्र यशस्वीला एकच धाव घेता आली. त्यामुळे सामन्यातनंतर सुपर ओव्हरही टाय झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुपर ओव्हरनेच विजेता ठरणार आहे.
सुपर ओव्हरआधी अफगाणिस्तानसमोर टीम इंडियाने 213 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. या विजयी धावांचा पाठलाग करताना अफगाणिनस्तानला शेवटच्या बॉलवर फक्त 3 धावा हव्या होत्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजाने फोर मारला असता तर तिथेच विषय संपला असता. पण तसं झालं नाही. टीम इंडियासमोर अफगाणिस्तानला शेवटच्या बॉलवर 2 धावाच घेता आल्या. त्यामुळे पहिली सुपर ओव्हर झाली.
आता सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तान बॅटिंगसाठी आली. अफगाणिस्तानने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 16 धावा केल्या. आता टीम इंडियाला 17 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हुशारीने 16 धावा केल्या. पण अवघी 1 धाव करण्यात अपयश आलं. झालं, पहिली सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे आता दुसऱ्या सुपर ओव्हरने सामन्याचा निकाला लागणार आहे.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा आणि रिंकू सिंह या जोडीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 190 धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडयियाने 20 ओव्हरमध्ये 212 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयासाठी213 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानने अखेरपर्यंत जोरदार लढत दिली. अफगाणिस्तानला विजयासाठी 20 व्या ओव्हरमध्ये 19 धावांची गरज होती. अफगाणिस्तानची गुलाबदीन नायब आणि शरफुद्दीन अश्रफ या जोडीने 5 बॉलमध्ये 16 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 3 धावांची गरज होती. मात्र अफगाणिस्तानला शेवटच्या बॉलवर 2 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना टाय झाला.
सुपर ओव्हरही टाय
After 40 overs – Tie.
After first Super Over – Tie.We are going into second Super Over….!!!! pic.twitter.com/R9OBEAIRU3
— Johns. (@CricCrazyJohns) January 17, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.