बंगळुरु | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी 20 सामना हा टाय झाला आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानुसार अफगाणिनस्तानने शेवटपर्यंत लढत दिली. अफगाणिनस्तानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 3 धावांची गरज होती. मात्र टीम इंडियाने फक्त 2 धावा दिल्याने सामना हा बरोबरीत सुटला. अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 212 धावाच करता आल्या.
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नाबाद 121 आणि रिंकू सिंहच्या नॉट आऊट 69 रन्सच्या जोरावर 212 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयासाठी 213 धावांच आव्हान देता आलं. मात्र अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 212 धावाच करता आल्या.
अफगाणिस्तानकडून या धावांचा पाठलाग करताना पहिल्या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. गुलाबदीन नाईब याने सर्वाधिक नाबाद 55 धावा केल्या. विकेटकीपर बॅट्समन रहमानुल्ल्हा गुरुबाज याने 50 धावा केल्या. तर कॅप्टन इब्राहीम झद्रान याने 50 रन्स केल्या. तर मोहम्मद नबी याने 16 बॉलमध्ये 34 धावांची निर्णायक खेळी केली. अझमतुल्लाह ओमरझई झिरोवर आऊट झाला.
करीम जनात 2 धावांवर रन आऊट झाला. नजीबुल्लाह झद्रान 5 रन करुन माघारी गेला. तर शरफुद्दीन अश्रफ 5 धावांवर नाबाद परतला. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान आणि कुलदीप यादव या दोघांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
टीम इंडिया-अफगाणिस्तान तिसरा सामना टाय
1⃣7⃣ runs to win the Super-Over and the match!
Come on #TeamIndia 🙌
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fLTfeOxJGN
— BCCI (@BCCI) January 17, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.