Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG | रोहितचं तडाखेदार शतक, रिंकूचं अर्धशतक, अफगाणिस्तानसमोर 213 धावांचं आव्हान

India vs Afghanistan 3rd T20i 1st Innings Highlights | रिंकू सिंह आणि कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनी अफगाणिस्तानच्या फलंदांजाना झोडून काढलं. रोहितने शतक तर रिंकूने अर्धशतक झळकावलं.

IND vs AFG | रोहितचं तडाखेदार शतक, रिंकूचं अर्धशतक, अफगाणिस्तानसमोर 213 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 9:15 PM

बंगळुरु | कॅप्टन रोहित शर्मा आणि फिनीशर रिंकू सिंह या दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या वादळी 190 धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने अफगाणनिस्तानला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 22 धावांवर 4 विकेट्स गमावल्यानंतर रोहित आणि रिंकू या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर या दोघांनी गिअर बदलत बॅटिंग केली. या विक्रमी भागीदारीच्या दरम्यान रोहितने पाचवं टी 20 शतक झळकावलं. तर रिंकूनेही झंझावाती अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी अखेरच्या 14 चेंडूत तोडफोड बॅटिंग करत 64 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 212 धावांपर्यंत मजल मारता आली.

आधी घसरगुंडी मग अफगाणिस्तानला दणका

टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात फार वाईट झाली. विराट कोहली आणि संजू सॅमसन दोघेही पहिल्या बॉलवर आऊट झाले. तर शिवम दुबे 1 आणि यशस्वी जयस्वाल 4 धावा करुन माघारी परते . त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 4.3 ओव्हरमध्ये 22 अशी झाली. मात्र त्यानंतर रोहित आणि रिंकूने डाव सावरत अफगाणिस्तानवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

या दोघांनी आधी थंड घेत त्यानंतर टॉप गिअर टाकला. दोघांनी दे दणादण फटके मारले. रोहितने एका बाजूला शतक केलं. तर रिंकूनेही नेहमीप्रमाणे फिनीशिंग टच दिला. रोहितने 69 बॉलमध्ये 121 धावांची नाबाद खेळी केली. तर रिंकू सिंह 69 धावांवर नाबाद परतला. अफगाणिस्तानकडून फरीद अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अझमतुल्लाह याला 1 विकेट मिळाली.

रोहित शर्मा आणि रिंकू सिंहचा तडाखा

अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.

अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.