बंगळुरु | टीम इंडिया तिसऱ्या टी 20 सामन्यात अखेर दुसरी सुपर ओव्हर खेळल्यानंतर विजयी झाली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने ही दुसरी सुपर ओव्हर टाकली. रवीने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर 1 धाव दिली. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर रवीने दुसरी विकेट घेतली. त्यामुळे अफगाणिस्तानची स्थिती 2 बाद 1 अशी स्थिती झाली. टीम इंडियाने अशाप्रकारे तिसरा सामना डबल सुपर ओव्हरनंतर जिंकला. टीम इंडियाने या विजयासह अफगाणिस्तानला 3-0 अशा फरकाने व्हाईट वॉश दिला.
टीम इंडियाने अफगाणिस्तानला विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानला 20 व्या ओव्हरमध्ये विजयासाठी 19 धावा हव्या होत्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सामना शेवटच्या बॉलपर्यंत खेचून आणला. आता 1 बॉलमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज होती. मात्र अफगाणिस्तानला 2 धावाच करता आल्या.त्यामुळे मॅच टाय झाली. त्यामुळे पहिली सुपर ओव्हर झाली.
अफगाणिस्तानने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 16 धावा केल्याने टीम इंडियाला विजयासाठी 17 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हुशारीने 16 धावा केल्या. पण अवघी 1 धाव करता आली नाही. त्यामुळे पहिली सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर झाली.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने 11 धावा केल्याने अफगाणिस्तानला 12 धावांचं आव्हान मिळालं. मात्र रवी बिश्नोई याने 1 धाव देत अफगाणिस्तानला 2 झटके दिले आणि टीम इंडिया दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजयी झाली.
टीम इंडियाचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजयी
A tied match 😮
A tied Super Over 😱India win the second Super Over to seal a 3-0 whitewash 🙌#INDvAFG 📝: https://t.co/DWK9Rn6PsN pic.twitter.com/gvQGEJVHMC
— ICC (@ICC) January 17, 2024
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.