IND vs AFG 3rd T20i Toss | रोहितने टॉस जिंकला, अफगाणिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल

India vs Afghanistan 3rd T20i Toss Update | टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरा सामना हा बंगळुरुत आयोजित करण्यात आला आहे.

IND vs AFG 3rd T20i Toss | रोहितने टॉस जिंकला, अफगाणिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 7:02 PM

बंगळुरु | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी 20 सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे.

दोन्ही संघात 3-3 बदल

टीम इंडिया आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी 3 बदल केले आहेत. अक्षर पटेल, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंह यांना बाहेर बसवण्यात आलं आहे. तर त्यांच्या जागी कुलदीप यादव, संजू सॅमसन आणि आवेश खान या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर अफगाणिस्तानने कैस अहमद, शरफुद्दीन अश्रफ आणि मोहम्मद सलीम साफी या तिघांना प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तर नूर अहमद, फझलहक फारुकी, नवीन उल हक आणि मुजीब उर रहमान यांना बाहेर ठेवण्यात आलं आहे.

टीम इंडियाकडे क्लिन स्वीप देण्याची संधी

टीम इंडियाने या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकले आहे. त्यामुळे टीम इंडिया 2 विजयासह मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्याची संधी आहे. रोहितने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी बेधुंद बॅटिंग पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाची पहिली बॅटिंग

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकूण 7 टी 20 सामने झाले आहेत. टीम इंडियाने या 7 पैकी 6 सामन्यात अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत विजय मिळवला आहे. तर एक सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.