IND vs AFG T20i Series | मालिकेच्या 1 दिवसआधी टीमला मोठा धक्का, स्टार खेळाडू ‘आऊट’
India vs Afganistan t20i Series | अफगाणिस्तान आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर पुन्हा एकदा भारतात टी 20 सीरिजसाठी आली आहे. टीम इंडिया विरुद्ध एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. त्याआधीच मोठा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान या बहुप्रतिक्षित टी 20 सीरिजला अवघे काही तास शिल्लक आहेत. उभयसंघात पहिल्यांदाच टी 20 मालिका होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा 11 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचा स्टार ऑलराउंडर राशिद खान हा टी 20 मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. राशिद पूर्णपणे फिट नाही. अफगाणिस्तान क्रिकेट टीमची या टी 20 मालिकेसाठी शनिवारी 6 जानेवारी रोजी घोषणा करण्यात आली. तेव्हापासून राशिद खान प्लेईंग ईलेव्हनमध्ये खेळणार की नाही, याबाबत शंकाच होती.
राशिदला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेदरम्यान दुखापत झालेली. राशिदच्या पाठीच्या खालील भागावर शस्त्रक्रिया झाली होती. राशिदला दुखापतीमुळे बीबीएलमध्ये एडीलेड स्टायकर्सकडून खेळता आलं नाही. काही दिवसांआधी यूएई विरुद्ध अफगाणिस्तान टी 20 मालिका पार पडली. राशिद या मालिकेतही खेळू शकला नव्हता.
राशिद खान टी 20 सीरिजमधून बाहेर!
Rashid Khan ruled out of the T20I series vs India. [Sportstar] pic.twitter.com/Ywc59gUyk6
— Johns. (@CricCrazyJohns) January 10, 2024
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 11 जानेवारी, मोहाली.
दुसरा सामना, 14 जानेवारी, इंदूर.
तिसरा सामना, 17 जानेवारी, बंगळुरु.