IND vs AFG | रोहितचं शतक, विराट अर्धशतक, टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 8 विकेट्सने धमाकेदार विजय
India vs Afghanistan Icc World Cup 2023 | टीम इंडियाने अफगाणिस्तानवर मात करत आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. रोहित शर्मा हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.
नवी दिल्ली | लोकल बॉय विराट कोहली याने टीम इंडियाला विजयी फटका मारुन विजय मिळवून दिलाय. टीम इंडियाने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये अफगाणिस्तान टीमचा 8 विकेट्सने धुव्वा उडवलाय. टीम इंडियाचा हा आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील सलग दुसरा विजय ठरला. तर अफगाणिस्तानला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 273 धावांच आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 35 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने विक्रमी शतक ठोकलं. तर विराट कोहली याने वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. तर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या तिघांनीही बहुमूल्य योगदान दिलं.
टीम इंडियाची बॅटिंग
रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने 273 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. रोहित-ईशान या दोघांनी सावकाश सुरुवात करत नंतर हिटिंग करायला सुरुवात केली. या दोघांनी 156 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर ईशान किशन 47 बॉलमध्ये 47 धावा करुन आऊट झाला. ईशाननंतर विराट कोहली मैदाना आला.
विराट आणि रोहित या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. रोहितने या दरम्यान 63 बॉलमध्ये विक्रमी आणि टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमधील वेगवान शतक ठोकलं. रोहितने शतकानंतर टॉप गिअर टाकत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना झोडायला सुरुवात केली. रोहितला शतकानंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. त्यानुसार तो खेळत होता. मात्र स्वीप मारण्याच्या नादात रोहित आऊट झाला. रोहितने 84 बॉलमध्ये 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या.
रोहितनंतर मुंबईकर श्रेयस अय्यर आला. विराटने श्रेयससोबत तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची नाबाद भागीदारी केली. विराटने या दरम्यान यंदाच्या वर्ल्ड कपमधील सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे विराटने हे त्याच्या होम ग्राउंडमध्ये अर्धशतक ठोकलं. तर शेवटी विराटनेच विजयी फटका मारुन टीम इंडियाला विजयी केलं. विराटने नाबाद 55 आणि श्रेयसने नॉट आऊट 25 रन्सचं योगदान दिलं. अफगाणिस्तानकडून राशिद खान यानेच दोन्ही विकेट घेतल्या.
टीम इंडियाची सलग दुसरा विजय
Captain Rohit Sharma is adjudged the Player of the Match for his scintillating record-breaking century in the chase 🔝#TeamIndia register a compelling 8⃣-wicket victory over Afghanistan 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/f29c30au8u#CWC23 | #INDvAFG | #MeninBlue pic.twitter.com/tlTLOk2xrF
— BCCI (@BCCI) October 11, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.