IND vs AFG Head to Head Records | टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरुद्ध रेकॉर्ड कसा? पाहा आकडे

India vs Afghanistan ICC World cup 2023 Head to Head Records | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजयी सुरुवात केली. मात्र टीम इंडियासमोर अफगाण्यांचं आव्हान आहे. टीम इंडियाची आतापर्यंत अफगाणिस्तान विरुद्ध कशी कामिगरी राहिलीय पाहा.

IND vs AFG Head to Head Records | टीम इंडियाचा अफगाणिस्तान विरुद्ध रेकॉर्ड कसा? पाहा आकडे
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 12:30 AM

नवी दिल्ली | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी हा सामना पार पडणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. टीम इंडियाने कांगारुंना पराभूत करत विजयी सुरुवात केली होती. तर अफगाणिस्तानला फ्लॉप बॅटिंगमुळे पराभवाने पराभूत व्हावं लागलं. टीम इंडिया विजयी घोडदौड कायम राखण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. तर अफगाणिस्तानही तलवारीला धार लावून आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार हे निश्चित आहे.

आकडे टीम इंडियाच्याच बाजूने

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वनडे क्रिकेटमधील हेड टु हेड रेकॉर्ड आपण जाणून घेत आहोत. टीम इंडियाच आतापर्यंत अफगाणिस्तानवर वरचढ राहिली आहे. अफगाणिस्तानला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. मात्र अफगाणिस्तान चिवट टीम आहे. अफगाणिस्तान अखेरपर्यंत लढत राहेत. अफगाणिस्तान लढून हरणारी टीम आहे. मात्र अफगाणिस्तान सहजासहजी नांग्या टाकत नाही. टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध आतापर्यंत एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा यापैकी 2 सामन्यात वरचष्मा राहिला आहे.

टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 2 वेळा विजय मिळवला आहे. तर टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एक सामना हा टाय झाला. त्यामुळे आता टीम इंडिया तिसरा विजय मिळवते की अफगाणिस्तान विजयाचं खातं उघडते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.