IND vs AFG Playing 11 | अफगाणिस्तान विरुद्ध श्रेयस अय्यर याला डच्चू, सूर्याला संधी?
Team India Playing 11 Against Afghanistan CWC 2023 | अफगाणिस्तान विरद्ध टीम इंडिया मॅनेजमेंट बॅटिंग ऑर्डरमधून श्रेयसला उडवणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर मिस्टर 360 सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील नववा सामना टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचा हा या वर्ल्ड कपमधील दुसरा सामना असणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रलियावर मात करत वर्ल्ड कपमध्ये विजयाने सुरुवात केली. तर बांगलादेशने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवत विजयी सलामी दिली. टॉप ऑर्डर 200 धावांचा पाठलाग करताना फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर केएल राहुल 97* आणि विराट कोहली याने 85 धावा केल्या. या दोघांमुळे टीम इंडियाचा विजय झाला.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे तिघेही ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या 2 ओव्हरमध्ये झिरोवर आऊट झाले होते. या तिघांनाही खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यनासाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. मात्र बॅटिंगमध्ये इच्छा असूनही टीम इंडियाला 2 ऐवजी एकच बदल करता येणार आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर याची प्लेईंग ईलेव्हनमधून उचलबांगडी होऊ शकते.
ओपनिंग बॅट्समन शुबमन गिल हा आजारपणामुळे अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार नाही. त्यात ईशान किशन हा विकेटकीपर आणि ओपनिंग करण्यात माहिर आहे. ईशान ऑस्ट्रेलिया विरुद्ध फुस्स ठरला. मात्र विकेटकीपिंग आणि ओपनिंग या दोन्ही बाबी इशानचा प्लस पॉईंट आहे. केएल राहुल याला काही झालं तर विकेटकीपिंगही करु शकतो. त्यामुळे इच्छा असूनही ईशानला प्लेईंग ईलेव्हनमधून वगळता येणार नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर याचा पत्ता कट केला जाऊ शकतो.
सूर्युकमार यादव याला संधी!
दरम्यान श्रेयस अय्यर याला वगळून सूर्यकुमार यादव याचा समावेश केला जाऊ शकतो. सूर्याला संधी मिळाल्यास त्याचं वर्ल्ड कप पदार्पण ठरेल. त्यामुळे सूर्यकुमार यादव या संधीत कसं खेळेल याकडेही लक्ष असेल.
अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.