IND vs AFG | अफगाणिस्तानने वर्ल्ड कप 2019 मधील सामन्यात जेव्हा टीम इंडियाला रडवलेलं
India vs Afghanistan World Cup | अफगाणिस्तान क्रिकेट टीम कधीही आणि कुठेही उलटफेर करण्याची क्षमता ठेवते. अफगाणिस्तानने अनेकदा हे करुनही दाखवलंय. टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं आव्हान आहे.
नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मोहिमेची शानदार सुरुवात केली. टीम इंडियाने 5 वेळा वर्ल्ड कप उंचावलेल्या ऑस्ट्रलियाला नमवलं. त्यानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता अरुण जेटली स्टेडियमध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये याआधी 2019 ला भिडले होते. तेव्हा सामना अत्यंत चुरशीचा आणि थरारक झाला होता. अफगाणिस्तानला पराभूत करण्यासाठी टीम इंडियाला चांगलीच झुंज द्यावी लागली होती. त्यामुळे अफगाणिस्तानला गृहीत धरणं योग्य ठरणार नाही.
4 वर्षांपूर्वी काय झालं होतं?
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये 22 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने आले होते. हा सामना द रोज बाऊस स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. टीम इंडियाने 224 धावा करत अफगाण्यांना 225 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या 225 धावांचा शानदार बचाव करत सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला.
अफगाणिस्तानला शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज होती. मैदानात अफगाणिस्तानचा अनुभवी आणि सेट बॅट्समन मोहम्मद नबी होता. नबी 48 धावांवर खेळत होता. तर मोहम्मद शमी अखेरची निर्णायक ओव्हर टाकणार होता. अफगाणिस्तानने शेवटच्या ओव्हरपर्यंत नेलेल्या सामन्यात शमीने हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला. शमीच्या या हॅटट्रिकमुळे टीम इंडियाने हा सामना 11 धावांनी जिंकला.
मोहम्मद शमीची निर्णायक हॅटट्रिक
Hat-trick for Mohammed Shami 💥
On this day in 2019, the speedster became only the second Indian bowler to achieve this feat in an ICC Men’s @CricketWorldCup 👏
— ICC (@ICC) June 22, 2022
अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.