IND vs AFG, Video : दिल्लीचं अरुण जेटली मैदान पाच मिनिटांसाठी अंधारात, प्रेक्षकांनी लावल्या फोन लाईट्स आणि गायलं वंदे मातरम्
IND vs AFG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. भारताने हा सामना आपल्या बाजूने सहज वळवला. अफगाणिस्तानने दिलेलं 272 धावांचं आव्हान सहज गाठलं.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात पार पडला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान हे दोन संघ आमनेसामने होते. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्णय चुकीचा ठरला. अफगाणिस्तानला 50 षटकात 8 गडी गमवून 272 धावा करता आल्या. भारतासमोर विजयासाठी 273 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान भारताने सहज गाठलं. रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. पण भारताच्या डावात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. 7 वाजून 40 मिनिटांनी ड्रिंक टाइम झालं आणि लाइट अचानक बंद चालू होऊ लागल्या. काही क्षणातच फ्लड लाइट शो सुरु झाला आणि प्रेक्षकांनीही त्याला उत्तम साथ दिली.
उपस्थित प्रेक्षकांनी हातातील मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करून साथ दिली. हा लेझर शो जवळपास पाच मिनिटं सुरु होता. त्या वेळेत संपूर्ण स्टेडियम अंधारात होतं. या दरम्यान प्रेक्षकांनी वंदे मातरम् गाण्यास सुरुवात केली. यानंतर लाईट सुरु झाल्या आणि खेळ पुन्हा सुरु झाल्या.
Goosebumps 🥵💙 – India vs Afghanistan cricket World Cup 2023 match
Beautiful Light Show in Arun Jaitley Stadium in New Delhi with (Vande Mataram chants )🏟️ 🇮🇳 – #Bharat#CWC2023 #MSDhoni #Messi𓃵 #INDvsAFG #INDvAFG #Kohli #Naveen #Gambhir #GautamGambhir #RohitSharma #Hitman… pic.twitter.com/OiUZlATG8l
— Aakash Sharma 𝕏 (@Being_Skysharma) October 11, 2023
Light show at arun jately stadium delhi pic.twitter.com/5O4Tg3He1L#INDvsAFG #CWC2023
— Bemba Tavuma 2.0 (@PabloEs58765418) October 11, 2023
रोहित शर्मा याने या सामन्यात 84 चेंडूत 131 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 5 षटकार ठोकले. यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम रोहित शर्मा याने आपल्या नावावर केला. त्याने स्पर्धेत एकूण 7 शतकं ठोकली. इशान किशनने 47 चेंडूत 47 धावा केल्या. तर विराट कोहली याने 56 चेंडूत नाबाद 55 धावा, तर श्रेयस अय्यर याने 23 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.