IND vs AFG, Video: जसप्रीत बुमराह याने विकेट घेतल्यानंतर असं केलं सेलिब्रेशन, सोशल मीडियावर रंगली ‘त्या’ ॲक्शनची चर्चा

World Cup 2023, IND vs AFG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. आता अफगाणिस्तानचं आव्हान आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह यांचं अनोखं सेलिब्रेसन पाहायला मिळालं.

IND vs AFG, Video: जसप्रीत बुमराह याने विकेट घेतल्यानंतर असं केलं सेलिब्रेशन, सोशल मीडियावर रंगली 'त्या' ॲक्शनची चर्चा
IND vs AFG, Video : जसप्रीत बुमराहने विकेट घेतल्यानंतर केलं अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन, फुटबॉलपटूसोबत जोडली जातंय लिंकImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 3:29 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील नववा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात सुरु आहे. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करणं स्वीकारलं आहे. अपेक्षेप्रमाणे अफगाणिस्तानच्या संघाने सुरुवात केली आहे. विकेट घेण्यासाठी भारतीय गोलंदाजीची धडपड पाहून यावरून अंदाज बांधला जात आहे. पाटा विकेट असल्यामुळे या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्येचा अंदाज आहे. दरम्यान भारताकडून पहिली विकेट घेण्यात वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराह याला यश आलं. इब्राहिम झारदान याला 22 धावांवर असताना जसप्रीत बुमराह याने बाद केलं. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर केएल राहुल याने झेल घेतला.

कर्णधार रोहित शर्मा याने सातवं षटक जसप्रीत बुमराह याच्या हाती सोपवलं. बिनबाद 32 धावा अशी अफगाणिस्तानची स्थिती होती. यावेळी जसप्रीत बुमराहने चेंडू हाती घेतला आणि विकेटसाठी प्रयत्न सुरु केला. पण पहिल्याच चेंडूवर चौकार आला. त्यानंतर दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं. पण चौथ्या चेंडूवर इब्राहिम झाद्रन याची विकेट मिळवण्यात यश आलं. पण हे इतक्यावरच थांबलं नाही. जसप्रीत बुमराह याने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं.

जसप्रीत बुमराह याची ही स्टाईल मँचेस्टर युनाइटेड लिजेंड मार्कस रशोफोर्ड याच्या मिळतीजुळती आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. झाद्रनला बाद केल्यानंतर बुमराहने उजव्या हाताचं बोट कपाळाजवळ नेलं आणि स्क्रू फिरवतात तसा फिरवलं. आता यावर काही मीम्सही व्हायरल होत आहेत.

दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.