Video : पोहे आणि आवेश खान! टीम इंडियाच्या प्रत्येकाने दोघांपैकी एकाची केली अशी निवड
भारत अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिला सामना मोहालीत पार पडला. हा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. भारताने मालिकेत 1-0 आघाडी घेतली असून दुसरा सामना इंदुरमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये मजेशीर खेळ झाला. पोहे की आवेश खान हा व्हिडीओ पाहून तुमचंही मनोरंजन होईल.
मुंबई : अफगाणिस्तान विरुद्ध दुसरा टी20 सामना इंदुरमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. इंदुरच्या होलकर आंतरराष्ट्रीय मैदानात 14 जानेवारीला हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी संपूर्ण संघ आता इंदुरमध्ये पोहोचला आहे. इथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात टीम इंडियाच्या खेळाडूंनी बऱ्यापैकी मनोरंजन केलं. हसतखेळत मोहाली ते इंदुर हे अंतर कापलं. या प्रवासात खेळाडूंनी पोहे आणि आवेश खान यापैकी एकाची निवड करणारा खेळ खेळला. हा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. काही खेळाडूंनी इंदुरमध्ये चमचमीत खाण्यासाठी, तर काही खेळाडूंनी टीममेट आवेश खानला महत्त्व दिलं. आवेश खान मध्य प्रदेशमधील इंदुरमधला रहिवासी असल्याने हा खेळ रंगला. “नमस्कार, तुमचं सर्वांचं माझं शहर इंदुरमध्ये स्वागत आहे.”, असं आवेश खान या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला कुलदीप यादवने सांगितलं की, करिअरचे सुरुवातीचे दिवस आठवले. सराफा मार्केटमधील आठवणी या निमित्ताने जाग्या केल्या. फिल्डिंग कोट टी दिलीपने सांगितलं की, पोहे खायला आवडतं. रवि बिश्नोईने सांगितलं की, स्वच्छ शहर असून येथे यायला आवडतं. संजू सॅमसनने इंदुरला इंडोर असं संबोधलं आणि इंदुरचे लोकं खूपच मजेशीर असल्याचं सांगितलं. यासाठी त्याने आवेश खानचं उदाहरण दिलं.
No prizes for guessing where we are 😁
What happens when you have fun on your travel day 😎#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1Xr8ZyDV5v
— BCCI (@BCCI) January 13, 2024
दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियात काही बदल अपेक्षित आहेत. विराट कोहली संघात परतला आहे. तर यशस्वी जयस्वालही संघात खेळण्यासाठी सज्ज आहे. या दोघांनी संघात पुनरागमन केल्यास शुबमन गिल आणि तिलक वर्मा यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केलेल्या शिवम दुबेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तर संजू सॅमसन संघात तर आहे पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? हा देखील प्रश्न आहे.
अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार