IND vs AFG Head To Head : T20I मध्ये टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात मजबूत कोण?
India vs Afghanistan head to head records In T20i Cricket | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या दोन्ही संघात पहिल्यांदाच टी 20 मालिका होत आहे. याआधी दोन्ही संघ किती टी 20 सामने खेळले आहेत?
मुंबई | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी भरारी घेतली. अफगाणिस्तान कधीही कुठेही सामन्यात कमबॅक करण्यात पटाईत आहे. अफगाणिस्तानला कोणतीही टीम गृहीत धरण्याची चूक करत नाही, यावरुन त्यांची दहशत समजून येते. अफगाणिस्तानने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये काही उलटफेर केले. अफगाणिस्तानने प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत पुन्हा एकदा आपली छाप सोडली. अफगाणिस्तानने यासह आपण काय आहोत, हे दाखवून दिलं.
हेड टु हेड रेकॉर्ड
अफगाणिस्तान इतर संघांविरुद्ध वरचढ ठरते, मात्र ते टीम इंडिया विरुद्ध दचकून असते. अफगाणिनस्तानने आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये शरणागती पत्कारली आहे. मात्र अफगाणिस्तान कधीही काहीही करु शकते. त्यामुळे टीम इंडियाही अफगाणिस्तान विरुद्ध सावधरित्या खेळते.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 5 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया पूर्णपणे वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. मात्र अफगाणिस्तानने आपल्या चिवट खेळीच्या जोरावर टीम इंडियाला एक सामना जिंकण्यापासून रोखलंय. दोन्ही संघांतील एक सामना हा बरोबरीत राहिला होता. अफगाणिस्तानची टीम इंडिया विरुद्ध 0-4 अशी स्थिती आहे. त्यामुळे अफगाणिस्तान या मालिकेदरम्यान विजयाचं खातं उघडण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
मोहालीतील आकडेवारी
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला टी 20 सामना हा मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियममध्ये आतापर्यंत 9 टी 20 सामने पार पडले आहेत. या 9 पैकी 5 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणारी टीमचा विजय झाला आहे. तर 4 सामन्यात चेसिंग करणारी टीम जिंकलीय.
टी 20 सीरिजसाठी अफगाणिस्तान टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
टीम इंडिया | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.