IND vs AFG 3rd T20i | अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्यासाठी तयार, टीम इंडियात 3 बदल!

India vs Afghanistan 3rd T20i Playing 11 | टीम इंडियाचा डोळा हा अफगाणिस्तान विरुद्ध मालिका 3-0 ने जिंकण्याकडे असणार आहे. तर अफगाणिस्तान मात करत टीम इंडिया विरुद्ध विजयाचं खातं उघडण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

IND vs AFG 3rd T20i | अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्यासाठी तयार, टीम इंडियात 3 बदल!
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 5:41 PM

बंगळुरु | टीम इंडिया तिसऱ्या टी 20 सामन्यात विजयी घौडदौड कायम राखत अफगाणिस्तानला क्लिन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडयाची टी 20 वर्ल्ड कप आधी हा अखेरचा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू धमाका करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानला लोळवण्याची संधी आहे.

टीम इंडियाने अफगाणिस्तानवर दोन्ही सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 159 धावांचं आव्हान हे 15 बॉलआधी पूर्ण केलं. तर दुसऱ्या सामन्यात 173 रन्सचं टार्गेट हे 15.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मालिका जिंकली असल्याने टीम इंडियासाठी हा तिसरा सामना औपचारिकता आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रयोग करु शकते.

टीम इंडियात 3 बदलांची शक्यता

दरम्यान तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियात 3 बदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शुबमन गिल, कुलदीप यादव आणि आवेश खान या तिघांना संधी मिळू शकते. शुबमनला यशस्वीच्या जागी संधी दिली जाऊ शकते. कुलदीपसाठी रवी बिश्नोई किंवा वॉशिंग्टन सुंदर या दोघांना बाहेर बसावं लागू शकतं. तर आवेश खान याच्यासाठी मुकेश कुमारला बाहेर व्हावं लागू शकतं.

हे सुद्धा वाचा

पहिल्या सामन्यात रोहित रन आऊट

दरम्यान अफगाणिस्तान विरुद्ध रोहित शर्मा हा झिरोवर रन आऊट झाला होता. शुबमन गिल न धावल्याने रोहितला रन आऊट व्हावं लागलं होतं. नेटकऱ्यांनी रोहित रन आऊट होण्यासाठी जबाबदार धरलं. आता मात्र शुबमनला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात टीम मॅनेजमेंट हे 3 बदल करणार की त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.