IND vs AFG 1st T20i | टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली बाहेर
India vs Afghanistan T20I Series | टीम इंडियाला मालिका सुरु होण्याआधीच मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
मोहाली | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यांचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. पहिल्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. पहिला सामना हा मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानला मोठा झटका लागला. अफगाणिस्तानचा स्टार राशिद खान हा या टी 20 मालिकेतून बाहेर पडल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर आता टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी आली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी नोव्हेंबर 2022 नंतर 14 महिन्यांनी टीम इंडियात एन्ट्री झाली. त्यामुळे भारतीय चाहते या दोघांना पुन्हा एकदा टी 20 क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र पहिल्या सामन्याच्या काही तासांआधी वाईट बातमी समोर आली आहे. विराट कोहली पहिल्या टी 20 सामन्यातून बाहेर पडला आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीने याबाबतचं ट्विट केलं आहे.
नक्की कारण काय?
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, विराट वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नाही. मात्र तो उर्वरित मालिकेसाठी उपलब्ध असेल, असंही आयसीसीने सांगितलंय. आता विराटच्या जागी टीममध्ये कुणाला संधी दिली जाते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
विराट कोहली ‘आऊट’
Rahul Dravid confirms that star Indian batter will miss the first T20I against Afghanistan due to personal reasons 👀#INDvAFGhttps://t.co/T1P9myXfCu
— ICC (@ICC) January 10, 2024
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.