फूटमार्क पाहून तिथेच त्याची…., भर पत्रकार परिषदेत रवींद्र जडेजा आऊट ऑफ कंट्रोल

रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत आहे. रवींद्र जडेजाने मॅचच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर दिली.

फूटमार्क पाहून तिथेच त्याची...., भर पत्रकार परिषदेत रवींद्र जडेजा आऊट ऑफ कंट्रोल
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 9:44 PM

नागपूर : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर कसोटीतून धमाकेदार कमबॅक केलं. जडेजा याने आधी बॉलिंग मग बॅटिंग धमाका केला. जडेजाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाबाद 66 धावा केल्या. जडेजा दुसऱ्या दिवसाचा खेळ आटोपल्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरा गेला. या दरम्यान एकच हशा पिकला. जडेजाच्या ओठांवर शब्द आलाच होता, तितक्यात त्याने तो शब्द चलाखीने फिरवला. जडेजाला खेळपट्टीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर जडेजाने सांगितलं की ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानात टिकून राहण्यात काय अडचणी आल्या.

जडेजा काय म्हणाला?

“कुठे न कुठे वाटत होतं की, टर्निंग ट्रॅकवर एक भक्कम भागीदारी होते. त्यानंतर कोणताही बॅट्समन येईल, त्यासाठी इतके फुटमार्क्स पाहून त्याची तिथेच जागेवरच…… म्हणजेच थोड्या वेळासाठी घाबरुन जाईल की इतके फुटमार्क्स आहेत. यामुळे तो फलंदाज विश्वासाने सामना करु शकणार नाही”, असं जडेजा म्हणाला.

हे सुद्धा वाचा

जडेजा पत्रकार परिषदेत काय बोलला?

जडेजा जसं त्याची असं बोलला आणि मोठा पॉज घेतला. यानंतर जडेजा स्वत: हसायला लागला. तर पत्रकारांनाही हसू आवरलं नाही. उपस्थित प्रत्येकाने जडेजा याच्या ‘त्याची’ या शब्दानंतर आपल्या डोक्लालिटीने शब्द जोडून वाक्य पूर्ण केलं. यामुळे आणखी हा पिकला.

दुसऱ्या दिवसाचा धावता आढावा

दरम्यान नागपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर 7 विकेट्स गमावून 321 धावा केल्या. टीम इंडियाकडे 144 धावांची आघाडी आहे. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा 66 आणिअक्षर पटेल 52 धावांवर नाबाद आहेत.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.