IND vs AUS | पहिल्या वनडेआधी टीमला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. मात्र त्याआधी मॅचविनर खेळाडूला दुखापत झाली आहे. यामुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलंय.

IND vs AUS | पहिल्या वनडेआधी टीमला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 8:24 PM

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्याला आता 24 तासांपेक्षा कमी वेळ उरलाय. या मालिकेतील सलामीचा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या पहिल्या मॅचला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. टीम इंडियाच्या श्रेयस अय्यर याला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. तर जसप्रीत बुमाराह गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेर आहे. त्यात आता आणखी एक मोठा मॅचविनर क्रिकेटर दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. यामुळे टीमचं टेन्शन वाढलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर फिटनेसमुळे पहिल्या वनडेतून बाहेर होऊ शकतो. वॉर्नर कसोटी मालिकेदरम्यान मायदेशी परतला होता. वॉर्नरने 3 आठवडे विश्रांती घेतली. मात्र त्यानंतरही वॉर्नर दुखापतीतून सावरलेला नाही. वॉर्नरला गुरुवारी नेट्समध्ये फिटनेस द्यावी लागू शकते. तसेच वॉर्नरला खेळवण्याची जोखीम घेऊ शकत नाही, कारण तो पूर्णपणे फीट नाही, असं ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर शॉर्न मार्श म्हणाला.

शॉन मार्श काय म्हणाला?

“वॉर्नर जोवर पूर्णपणे फीट होत नाही तोवर त्याला खेळवण्याची घाई आम्ही करणार नाही”, असं शॉन मार्श पत्रकार परिषदेत म्हणाला. या दुखापतीमुळे फक्त ऑस्ट्रेलिया नाही, तर दिल्ली कॅपिट्ल्स टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलंय. कारण दिल्लीने वॉर्नरची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. ऋषभ पंत अपघातानंतर त्यातून बाहेर येतोय. त्याला रिकव्हर व्हायला आणखी काही महिने लागणार आहेत.यामुळे तो आयपीएलच्या 16 व्या मोसमात खेळण्यास असमर्थ आहे. यामुळे वॉर्नरला कर्णधार करण्यात आलंय. मात्र वॉर्नरच्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलंय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून रोहित शर्माच्या याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या कर्णधारपद सांभाळणार आहे. रोहितला कौटुंबित कारणामुळे पहिल्या सामन्यात खेळता येणार नाहीये.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.

वनडे सीरीजसाठी टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवह स्मिथ (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, झाई रिचर्डसन, सेन एबॉट, कॅमरन ग्रीन, एस्टन एगर, एलेक्स कॅरी, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.