IND vs AUS, 1st ODI : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाठदुखीचा त्रास सुरु झाला. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठदुखीवर नुकतीच न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात शस्त्रक्रिया झाली. त्याला या दुखापतीमधून सावरण्यासाठी अजून 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात 2023 वनडे वर्ल्ड कप होणार आहे. 2023 वनडे वर्ल्ड कपपर्यंत फिट होणं, जसप्रीत बुमराहसाठी सोपं नसेल.
6 महिने लांब रहाव लागणार आहे. त्यामुळे बुमराह ऑगस्टपासून नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव सुरु करेल अशी अपेक्षा आहे. सप्टेंबर 2023 मध्ये आशिया कप होणार आहे.
हार्दिक पंड्या नेमक काय म्हणाला?
जसप्रीत बुमराह संदर्भात ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने एक वक्तव्य केलय. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हार्दिक पंड्याच्या मते, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला काही फरक पडत नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईत होणाऱ्या पहिल्या वनडे मॅचआधी प्रेस कॉन्फरने हार्दिक पंड्याने हे विधान केलय. हार्दिक पंड्याच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. “प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, जस्सीच्या नसण्यामुळे टीम इंडियाला काही अडचण नाहीय” असं हार्दिक म्हणाला.
ते चांगली कामगिरी करतील
“मागच्या काही काळापासून जस्सी टीम इंडियासोबत नाहीय. तरीही आमचा गोलंदाजी विभाग चांगली कामगिरी करतोय. आमचे सगळेच बॉलर अनुभवी आहेत” असं हार्दिक पंड्या म्हणाला. जसप्रीत बुमराहवर नुकतीच न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झालीय. वर्ल्ड कपपर्यंत टीममध्ये पुनरागमन हे त्याचं लक्ष्य आहे. “जस्सी टीममध्ये असल्याने मोठा फरक पडतो. पण प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, आम्हाला यामुळे फार अडचण नाहीय. कारण ज्या खेळाडूंची जस्सीची जबाबदारी स्वीकारलीय, ते चांगली कामगिरी करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे” असं हार्दिक म्हणाला.
बीसीसीआयच्या मेडीकल स्टाफने स्पष्ट केलय की, जसप्रीत बुमराहला वर्ल्ड कप 2023 पर्यंत फिट करण्याची योजना आहे. जसप्रीत बुमराहवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत तो फिट होऊ शकतो. इएसपीए क्रिकइन्फोनुसार, जसप्रीत बुमराह मार्च अखेरपर्यंत न्यूझीलंडमध्ये राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टपासून तो गोलंदाजीचा सराव सुरु करेल.