IND vs AUS | रविंद्र जडेजाचा अफलातून कॅच, मार्नस लाबुशेन माघारी
आपल्या शानदार फ्लिडिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या रविंद्र जडेजा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात झेप घेत अफलातून कॅच घेतला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच पहिला झटका दिला. ट्रॅव्हिस हेड याला मोहम्मद सिराज याने बोल्ड केलं. त्यानंतर मिचेल मार्श आणि कॅप्टन स्टीव्हन स्मिथ या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकुदुखी ठरत होती. तेवढ्यात कॅप्टन हार्दिक पंड्याने याने स्टीव्हनचा काटा काढला. सेट झालेला स्टीव्हन 22 रन्स करुन माघारी परतला.
यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. तिसऱ्या विकेटसाठी मिचेल मार्श याने लाबुशेनसह 52 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र मिचेल याला रविंद्र जडेजाने आपल्या बॉलिंगवर मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलं. मार्शने 65 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मिचेल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 3 बाद 129 अशी स्थिती झाली होती.
रविंद्र जडेचा सुंदर कॅच
मार्शनंतर जोश इंग्लिस मैदानात आला. जोश आणि मार्नल लाबुशेन हे डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 10 धावा जोडल्या. धावसंख्या 139 वर पोहचली. सामन्यातील 23 वी ओव्हर कुलदीप यादव टाकायला आला.
सर जडेजा याने घेतलेला कडक कॅच
What a catch by Ravindra Jadeja – he's an best fielder in the world.#jadeja #INDvsAUS #AUSvINDpic.twitter.com/obgWINP4nq
— ?⭐? (@superking1815) March 17, 2023
ओव्हरमधील चौथ्या बॉलवर लाबुशेन याने फटका मारला. तो फटका थर्ड मॅनच्या दिशेने उभ्या असलेल्या रविंद्र जडेजाच्या दिशेने गेला. जडेजाने आपल्या दिशेने बॉल येत असल्याचं लक्षात घेऊन मागे धावू लागला. बॉल खाली पडण्याआधी जडेजाने हवेत उडी घेत एकहाताने सुंदर कॅच घेतला. जडेजाने लाबुशेनचा घेतलेल्या या कॅचचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघ
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा.