IND vs AUS 1st T20 : भारताचा दारुण पराभव, ऑस्ट्रेलिया 4 गडी राखून विजयी
IND vs AUS 1st T20 : पहिला सामन्यात मोठ्या धावसंख्येनंतरही भारताचा पराभव झाला असून ऑस्ट्रेलियाचा संघ 4 गडी राखून विजयी झालाय. तर दुसरीकडे टीम इंडियात विराटकडून आशा असताना त्यानं निराशा केलीय.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील (India vs Australia 1st t20) पहिला सामन्यात मोठ्या धावसंख्येनंतरही भारताचा पराभव झाला असून ऑस्ट्रेलियाचा संघ 4 गडी राखून विजयी झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला असून या मालिकेत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे.
बीसीसीआयचं ट्विट
Things went right down to the wire but it’s Australia who won the first #INDvAUS T20I.#TeamIndia will look to bounce back in the second T20I.
Scorecard ? https://t.co/ZYG17eC71l pic.twitter.com/PvxtKxhpav
— BCCI (@BCCI) September 20, 2022
4 विकेटनं विजय
ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावांचं लक्ष्य होतं. हे ऑस्ट्रेलियन संघानं 19.2 षटकात 6 गडी गमावून पूर्ण केले आणि सामना 4 विकेटने जिंकला.
राहुल-सूर्याची चांगली फलंदाजी
कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यावेळी विशेष काही करू शकले नाहीत आणि 5 व्या षटकात 35 धावांपर्यंत दोघेही पॅव्हेलियनमध्ये बसले होते. येथून राहुल आणि सूर्यकुमार यांनी डावाची धुरा सांभाळली.
संथ फलंदाजीमुळे सतत टीकेला सामोरे जाणाऱ्या राहुलने यावेळी तशी संधी दिली नाही आणि चौकार लगावत षटकार लगावला. राहुलने अवघ्या 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने सूर्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली.
हार्दिकचा फिनिशिंग टच
12व्या षटकात राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिकने यानंतर संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्याच्या आगमनानंतर सूर्याही फार काळ टिकू शकला नाही, तर अक्षर पटेल आणि दिनेश कार्तिक काही विशेष योगदान देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी हार्दिकने एकट्याने काम केले. या स्टार अष्टपैलू खेळाडूने आपले अर्धशतक 25 चेंडूत पूर्ण केले आणि त्यानंतर शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूत षटकारांची हॅट्ट्रिक करत भारताला दोनशेच्या पुढे नेले.
हे ट्विट पाहा
??? ???? ??? ??? ???? ????! @hardikpandya7 creamed 7⃣ Fours & 5⃣ Sixes to hammer 7⃣1⃣* off 3⃣0⃣ balls! ⚡️ ? #TeamIndia | #INDvAUS
Watch that stunning knock ?https://t.co/C1suCKBPK7 pic.twitter.com/3o86bZEIzn
— BCCI (@BCCI) September 20, 2022
पराभवाचं कारण काय?
भारताला स्पष्टपणे डेथ ओव्हर स्पेशलिस्टची कमतरता जाणवत आहे.यावेळी भुवनेश्वर कुमारनं 19वे षटक घेतले आणि 16 धावा दिल्या.अशा स्थितीत शेवटच्या षटकात फक्त 2 धावा शिल्लक होत्या.आशिया कप 2022 मध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले, जिथे टीम इंडियाचा सुपर 4 सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव झाला होता.
केएल राहुलचं अर्धशतक
केएल राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 55 धावा केल्या. राहुलने या डावात 35 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान राहुलनं 4 चौकार आणि 3 उत्कृष्ट षटकार लगावले. राहुलने अवघ्या 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलचे हे T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 18 वे अर्धशतक होते. 2022 मध्ये राहुलचे हे दुसरे अर्धशतक आहे. राहुलने सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलंय आहे.
विराटकडून निराशा
विराट पाचव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूत नाथन एलिकच्या चेंडूवर विराट आऊट झालाय. यावेळी कोहलीची विकेट कॅमरुन ग्रीननं घेतली. विराट कोहलीनं घोर निराशा केल्याचं चाहते म्हणताना दिसतायत.
रोहित शर्माचा रेकॉर्ड
रोहितनं मार्टिन गप्टिलसारखाच T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. मार्टिन गप्टिलच्या नावावर T20I क्रिकेटमध्ये 172 षटकार आहेत. आता रोहितच्या नावावरही 172 षटकार झाले आहेत.