विशाखापट्टणम | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ऑस्ट्रेलियाकडून जोस इंग्लिस याने वादळी शतक ठोकलं. तर इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाला या जोरावरच 20 ओव्हरमध्ये 200 पार मजल मारता आली.
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. स्टीव्हन स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्ट या सलामीन जोडीने सावध सुरुवात केली. या दोघांनी 31 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र रवी बिश्नोई याने ही जोडी फोडत टीम इंडियाला पहिला झटका दिला. रवीने मॅथ्यू शॉर्ट याला 13 धावांवर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर जोस इंग्लिस मैदानात आला.
जोस आणि स्टीव्हन या दोघांनी टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. मैदानात चौफेर फटकेबाजी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसं काढली. या दोघांनी जोरदार बॅटिंग केली. स्टीव्हन स्मिथ याने अर्धशतक पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला वादळी बॅटिंगसह जोस इंग्लिस याने आपलं शतक पूर्ण केलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 131 धावांची शतकी भागीदारी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांना ही जोडी फोडता येत नव्हती. मात्र कांगारुंच्या दुर्देवाने आणि टीम इंडियाच्या सुदैवाने स्टीव्हन स्मिथ रनआऊट झाला. प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार या दोघांनी स्मिथला रनआऊट केलं. स्मिथने 41 बॉलमध्ये 52 धावा केल्या.
स्टीव्हननंतर जोस आणि मार्कस स्टोयनिस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 19 रन्स केल्या. जोस इंग्लिस याला प्रसिद्ध कृष्णा याने यशस्वी जयस्वाल याच्या हाती कॅच आऊट केलं. इंग्लिसने 50 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 11 चौकारांच्या मदतीने 110 धावांची शतकी खेळी केली. तर मार्कस स्टोयनिस 7 आणि टीम डेव्हिड 19 धावा करुन नाबाद परतले. टीम इंडियाकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
जोस इंग्लिसचं खणखणीत शतक
✅ Maiden T20I hundred
✅ Joint-fastest by an Australian in men’s T20IsJosh Inglis produced a brilliant innings in Vizag 🎉#INDvAUS | 📝: https://t.co/swsjiTkHZG pic.twitter.com/4p52ZwWnG1
— ICC (@ICC) November 23, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसीध कृष्णा.