IND vs AUS Weather | पहिल्या टी 20 सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द होणार?
India vs Australia Visakhapatnam Weather Report | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी 20 सामन्यात पाऊस होणार? खेळपट्टीची कुणाला साथ मिळणार? टॉस जिंकून बॅटिंग घ्यावी की फिल्डिंग? जाणून घ्या.
विशाखापट्टणम | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची 20 नोव्हेंबर रोजी सांगता झाली. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर आता 3 दिवसांनी पुन्हा टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा दोन हात करणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेचा श्रीगणेशा 23 नोव्हेंबरपासून होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा गुरुवारी 23 नोव्हेंबरला होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ वाय एस राजशेखर रेड्डी एसीए वीडीसीए क्रिकट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. सामन्याला पावसामुळे विलंबाने सुरुवात होऊ शकते.
हवामान कसं असेल?
एक्युवेदरने दिलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या दिवशी 23 नोव्हेंबरला दुपारी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी 6, दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 वाजता पाऊस होऊ शकतो. इतकंच नाही, तर सामन्याआधी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच सामन्यादरम्यान संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजून 30 मिनिटांदरम्यान ढगाळ वातावरण असेल. तसेच संध्याकाळी 5 वाजता म्हणजेच सामन्याच्या 2 तासांआधी पाऊस झाला , तर टॉस आणि मॅच सुरु व्हायला विलंब होऊ शकतो.
खेळपट्टीची मदत कुणाला?
या स्टेडियममध्ये गेल्या 10 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमची एव्हरेज स्कोअर 132 इतका आहे. त्यामुळे टॉस जिंकणारी टीम इथे आधी फिल्डिंगचा निर्णय घेते. दुसऱ्या डावात बॅटिंग करणारी टीमची विजयाची शक्यता ही 67 इतकी आहे. तसेच या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्सना मदत होते.
टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन एब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.