IND vs AUS T20I Dream 11 | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यासाठी अशी बनवा ड्रीम 11
India vs Australia 1st T20I Dream 11 Prediction | वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबरला होणार आहे.
मुंबई | ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं. टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील सलग 10 सामने जिंकले. मात्र एक सामनाच गमावला आणि वर्ल्ड कप ट्रॉफीचं स्वप्न भंग झालं. आता टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याला भारतीय क्रिकेट संघांचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. तर मॅथ्यू वेड हा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टी 20 सीरिजमधील पहिला सामना हा विशाखापट्टमण येथील डॉ वायएसआर एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाच्या आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या अनुभवी खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विश्रांती देण्यात आलेले बहुतांश खेळाडू हे वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाली होते. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 10 टी 20 मालिका झाल्या आहेत. उभयसंघात अखेरची मालिका ही सप्टेंबर 2022 मध्ये झाली होती. तेव्हा टीम इंडियाने ही 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.
संभावित ड्रीम 11 टीम
मॅथ्यू वेड (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि ट्रेव्हिस हेड.
ऑलराउंडर | ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, अक्षर पटेल,
बॉलर | प्रसिध कृष्णा, एडम झॅम्पा आणि नॅथन एलिस.
कर्णधार आणि उपकर्णधार कुणाला करता येईल?
कर्णधार आणि उपकर्णधार करण्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय आहे. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल याला कॅप्टन आणि यशस्वी जयस्वाल याला उपकर्णधार करता येईल. तसेच ट्रेव्हिस हेड याला कर्णधार आणि नॅथन एलिस याला उपकर्णधार करता येईल.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर वरचढ
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 26 टी 20 मॅचेस खेळवण्यात आल्या आहेत. या 26 सामन्यांमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर सरस ठरली आहे. भारतीय क्रिकेट संघाने कांगारुंचा 15 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर ऑस्ट्रेलियाला केव 10 मॅचेसमध्ये विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर एकमेव सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टी 20 सीरिज कुठे पाहता येईल?
The Digits 🔢 to catch #INDvAUS LIVE!
Get ready for the redemption battle against 🇦🇺 in the #IDFCFirstBankT20ITrophy, starting Nov 2️⃣3️⃣, LIVE on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex! 🙌#JioCinemaSports pic.twitter.com/6xi901glwq
— JioCinema (@JioCinema) November 22, 2023
अखेरच्या 5 टी सामन्याच्या निकाल कुणाच्या बाजूने?
दरम्यान गेल्या 5 टी 20 सामन्यांमध्येही टीम इंडियाच बोलबाला राहिला आहे.भारताने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे.