Ind vs Aus 1st Test : बॉर्डर-गावसकर मालिकेला गुरुवारपासून सुरुवात, जाणून घ्या पहिल्या सामन्याबाबत
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सलामीचा सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवार 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावसकर सीरिजला सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. नागपूरमध्ये जन्मलेला रोहित शर्मा या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. तर पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
आकडेवारी कोणच्या बाजूने?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 102 कसोटी सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 42 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 30 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. तर 28 सामने अनिर्णित राहिले. तर 1 सामना बरोबरीत सुटला.
भारतातील आकडे
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत भारतात 50 सामने झाले आहेत. यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 21 वेळा पराभूत केलंय. तर ऑस्ट्रेलियाने 13 वेळा टीम इंडियाचा पराभव केलाय. 15 सामने अनिर्णित राहिले तर 1 सामना बरोबरीत सुटला.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.
टीम इंडियासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनलच्या दृष्टीने निर्णायक अशी आहे. टीम इंडियाला डब्लूटीसीच्या फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर ही मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकणं भाग आहे. त्यात टीम इंडियाचा कर्णधार हा पक्का नागपूरकर आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या सामन्यात विजय मिळवून शानदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल.