IND vs AUS : विराटच्या शतकासह भारताचा डाव घोषित, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने पहिल्या डावात 150 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 487 धावा करत डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं आव्हान दिलं आहे.

IND vs AUS : विराटच्या शतकासह भारताचा डाव घोषित, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 3:14 PM

भारताने पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताचा डाव 150 धावांवरच आटोपला. त्यामुळे भारताचं काही खरं असंच वाटत होतं. पण कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त 104 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला आधीच 46 धावांची आघाडी मिळाली होती. या आघाडीसह पुढे खेळताना ओपनिंगला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 201 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडिया मजबूत स्थितीत आली. यशस्वी जयस्वालने 297 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 161 धावा केल्या. तर केएल राहुलने 176 चेंडूंचा सामना करत 5 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नववं शतक ठोकलं आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील त्याचं हे सातवं शतक आहे. यासह टीम इंडियाने 487 धावांवर मजल मारली. भारताच्या 533 धावा झाल्या होत्या आणि विराटचं शतकही त्यामुळे कर्णधार जसप्रीत बुमराहने डाव घोषित केला. आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं आव्हान आहे. आता हे आव्हान ऑस्ट्रेलिया गाठणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारताने हा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच सामन्याचा पेपर थोडा सोपा होईल. तर ऑस्ट्रेलियाचं गणित मात्र अवघड होत जाईल. इतकंच काय तर भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचेल.

दरम्यान, जसप्रीत बुमराहने मॅकस्वीनेला पहिलाच धक्का दिला आहे. चौथ्या चेंडूवर त्याला पायचीत करत तंबूत धाडलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर दडपण आलं आहे. नाईट वॉचमन म्हणून पॅट कमिन्सला मैदानात धाडलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.