नागपूर : रवींद्र जडेजा याने नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गाजवला. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या टॉपच्या 5 फलंदाजांना आऊट केलं. यामुळे ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर गेली. जडेजाने 5 महिन्यांनी कमबॅक केलं. त्यानंतर जडेजाची बॉलिंग ही चर्चेचा विषय ठरला. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत जडेजा बॉलसोबत छेडछाड करत असल्याचं म्हटलं जात आहे. जडेजाच्या या संशयास्पद कृतीमुळे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
ऑस्ट्रेलिया मीडियाकडून आधीच नागपूरच्या खेळपट्टीवरुन टीम इंडियावर आरोप करण्यात येत होते. त्यात आता ऑस्ट्रेलिया मीडियाला आयता मुद्दाच हाती लागला आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही या विषयाला धरुन ठेवलंय. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन यानेही निशाणा साधला आहे.
या व्हायरल व्हीडिओत जडेजा बॉलिंग टाकण्याआधी मोहम्मद सिराज याच्याकडे जातो. सिराजच्या हातावर मलमसदृश पदार्थ असतो. तो पदार्थ जडेजा बोटाने घेतो. जडेजा तो पदार्थ ज्या हाताने बॉल टाकतो त्या हातावरील बोटाला लावला. हा पदार्थ चिकट असल्याचं दिसून येतोय. मात्र जडेजा बॉलसोबत छेडछाड केल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हीडिओ टीम पेन यानेही शेअर केला आहे. तर मायकल वॉन यानेही म्हटलं की आम्ही असं कधी पाहिलं नाही.
जडेजाकडून बॉलसोबत छेडछाड?
What do you think of this @tdpaine36 Looks like one player giving grippo to the bowler and him rubbing it all over his spinning finger to me. Thoughts? pic.twitter.com/XjcNedJ3Sc
— Darren Lock (@Dags_L) February 9, 2023
दरम्यान रवींद्र जडेजाने घेतलेल्या 5 विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर आटोपला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर ऑलआऊट केलं. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख 5 फलंदाजांना आऊट केलं.
जडेजाने एकूण 22 ओव्हर टाकल्या. या 22 ओव्हरमध्ये त्याने 8 षटकं ही निर्धाव टाकली. तर 47 रन्स देत 5 महत्तवपूर्ण विकेट्स घेतल्या. जडेजाने मार्नल लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी या पाच जणांचा काटा काढला.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.