Video : विराट कोहली कोण होतास तू, काय झालास तू? बॅटिंगमध्ये तर फेल गेला आणि मोक्याच्या क्षणी नको ते केलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानात सुरु आहे. या सामन्यात भारताने खरं तर साजेशी कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही. भारताचा संपूर्ण संघ 150 धावांवर बाद झाला. पण जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पण विराट कोहलीकडून मोक्याच्या क्षणी मोठी चूक झाली.

Video : विराट कोहली कोण होतास तू, काय झालास तू? बॅटिंगमध्ये तर फेल गेला आणि मोक्याच्या क्षणी नको ते केलं
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 3:25 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पहिल्याच दिवशी रंगतदार वळणावर आला आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात तग धरून खेळतील का? असा प्रश्न आधीपासूनच क्रीडाप्रेमींना पडला होता. झालंही तसंच. भारताचा संपूर्ण संघ 150 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे पहिल्याच दिवशी हातातून सामना गेला असं भारतीय क्रीडाप्रेमींना वाटलं होतं. पण नाही. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कमबॅक केलं. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. एकीकडे 150 धावांचं सोपं टार्गेट असताना अवघ्या 50 धावांच्या आत निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचं नजराणा क्रीडाप्रेमींना पाहायला मिळाल. खरं तर या कसोटी मालिकेत विराट कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. मात्र पहिल्याच सामन्यात फेल गेला. विराट कोहलीला सूर गवसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. मात्र मागचा अनुभव पाहता त्याला वारंवार संधी दिली जात आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात काही खास करू शकला नाही. 12 चेंडूंचा सामना करून अवघ्या 5 धावा करून बाद झाला. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण क्षेत्ररक्षणातही नको ती चूक करून बसला.

जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची तारांबळ उडाली होती. संघाच्या तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने नाथन मॅकस्वीनेला बाद केलं. त्याला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर लाबुशेन चुकला आणि बॅटचा कोपरा लागून थेट विराट कोहलीच्या हातात चेंडू गेला. दुसऱ्या स्लिपला असलेल्या विराट हा झेल सहज पकडेल असं वाटत होतं आणि सेलिब्रेशनही सुरु झालं होतं. पण विराट कोहलीने झेल सोडल्याचं पाहून खेळाडूंचा भ्रमनिरास झाला.

मार्नस लाबुशेनची विकेट वाचली असली तरी दुसऱ्या बाजूला धडाधड विकेट पडत होत्या. उस्मान ख्वाजाची विकेट पडली. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथला खातही खोलता आलं नाही. हार्षित राणानेही पदार्पणाच्या सामन्यात हात लाल केला. ट्रेव्हिस हेडची बाद करत विकेटचा नारळ फोडला. त्यानंतर आलेला मिचेल मार्शही काही खास करू शकला नाही. मार्श 6 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, मार्नस लाबुशेन तग धरून होता. 50 चेंडूंचा सामना करून 2 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सेशनच्या सुरुवातीला सिराजने त्याला पायचीत केलं आणि त्याचा खेळ आटोपला. लाबुशेनने 52 चेंडूत 2 धावा करून बाद झाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.