IND vs AUS : शतकी खेळी करताच विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, अनुष्काला…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. कारण भारताने विजयासाठी 534 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. हे गाठताना ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज गमावले आहेत. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीच्या शतकी खेळीने लक्ष वेधून घेतलं.
भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला होता. तेव्हा भारतीया क्रीडाप्रेमींनी आशा सोडून दिल्या होत्या. पण भारतीय गोलंदाजींनी ऑस्ट्रेलियाला 104 धावांवरच गारद केलं. त्यामुळे विजयाचा आशा पल्लवित झाल्या. 46 धावांची आघाडीसह भारताने दमदार सुरुवात केली. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालच्या 201 धावांच्या भागीदारीने भारताने मोठ्या धावसंख्ये कूच केली. इतकंच काय तर मधल्या फळीत विराट कोहलीने दमदार शतक ठोकलं. बऱ्याच कालावधीनंतर विराट कोहलीच्या फलंदाजीत शतक आलं. विराट कोहलीचं हे 81 वं आंतरराष्ट्रीय शतक आहे. विराट कोहलीचं ह 30वं कसोटी शतक आहे. विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे नववं शतक आहे. तर ऑस्ट्रेलियात ठोकलेलं सातवं शतक आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकं ठोकणार भारती य फलंदाज आहे. या शतकानंतर विराट कोहलीने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला शतकांचा दुष्काळ दूर केला आहे. या शतकी खेळीनंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विराट कोहलीने शतकी खेळीनंतर समालोचकाशी संवाद साधला, ‘माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडींसोबत अनुष्का माझ्यासोबत आहे. पडद्यामागे घडणाऱ्या सर्व गोष्टी तिला माहीत आहेत. तुम्ही चांगली कामगिरी करत नसल्यावर डोक्यात काय चालले आहे हे माहीत आहे. मी काही फायद्यासाठी फिरणारा माणूस नाही. देशासाठी कामगिरी केल्याचा मला अभिमान वाटतो.’
विराट कोहलीने 143 चेंडूंचा सामना करत 100 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट 69.93 आहे. दरम्यान विराट कोहलीचं शतक होताच कर्णधार जसप्रीत बुमराहने डाव घोषित केला. विराटचं शतक झालं तेव्हा भारताच्या 6 गडी बाद 487 धावा होत्या. पहिल्या डावातील आघाडीसह भारताने 533 धावा केल्या आहेत आणि विजयासाठी 534 धावा दिल्या आहेत.
दुसरीकडे, दुसऱ्या डावात विराट कोहलीने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पॅट कमिन्सचा झेल पकडला. यासह विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. सचिनने कसोटीत 115 झेल पकडले. तर विराटच्या नावावर 116 झेल झाले आहेत. 210 झेलसह राहुल द्रविड आघाडीवर आहे.