IND vs AUS : बॉर्डर गावसकर मालिकेत या फलंदाजांचं नाणं खणखणलं, तीन भारतीयांनी खोऱ्यानं काढल्यात धावा!

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. हा सामना ड्रॉ झाला असला तरी भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.

IND vs AUS : बॉर्डर गावसकर मालिकेत या फलंदाजांचं नाणं खणखणलं, तीन भारतीयांनी खोऱ्यानं काढल्यात धावा!
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 4:58 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. हा सामना ड्रॉ झाला असला तरी भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. 1996 पासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 16 वेळा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका खेळवली गेली आहे. ज्यामध्ये भारताने 11 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे, तर ऑस्ट्रेलियाने ट्रॉफीवर 5 वेळा कब्जा केला आहे. तुम्हाला माहिती का आतापर्यंत 16 बॉर्डर-गावसकर मालिकांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरने इतिहासात सर्वाधिक धावा केल्या आहेत. 1996 ते 2013 पर्यंत सचिनने 34 सामने खेळले असून त्याने 3262 धावा केल्या होत्या. या यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग असून त्याने 1996 ते 2012 यादरम्यान 29 सामन्यांमध्ये 2555 धावा केल्या आहेत.

भारताचा अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण तिसऱ्या क्रमांकावर आहे. 1998 ते 2012 दरम्यान त्याने या मालिकेत 29 सामने खेळले असून त्याने 2434 धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानी ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड आहे.

द्रविडने 1996 ते 2012 दरम्यान या मालिकेत 32 सामने खेळले असून त्याने 2143 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मायकल क्लार्क या यादीत पाचव्या स्थानावर आहे. क्लार्कने 2004 ते 2014 दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 22 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 2049 धावा केल्या होत्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्या डावात 480 धावा केल्या. टीम इंडियाने या प्रत्युत्तरात 571 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 91 धावांची आघाडी मिळाली. मात्र सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत बॅटिंग करत सामना ड्रा केला.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.