IND vs AUS : 2013 नंतर भारतात पूर्ण दिवस बॅटींग करणारा ‘हा’ ठरला दुसराच खेळाडू

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर उस्मान ख्वाजा 104 नाबाद आणि कॅमेरून ग्रीन 49 नाबाद आहेत. या शतकासह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

IND vs AUS : 2013 नंतर भारतात पूर्ण दिवस बॅटींग करणारा 'हा' ठरला दुसराच खेळाडू
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 8:10 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरू आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम बॅटींग करताना 4 विकेट्सवर 255 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर उस्मान ख्वाजा 104 नाबाद आणि कॅमेरून ग्रीन 49 नाबाद आहेत. या शतकासह उस्मान ख्वाजाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

उस्मान ख्वाजाने आज दिवसभर मैदानावर तळ ठोकला होता. ट्राव्हिस हेड 32 धावा, मार्नस लाबुशेन 3 धावाा, स्टीव स्मिथ 38 धावा आणि पीटर हँड्सकॉम्ब 17 धावा करून बाद झाले. उस्मानने भारताच्या गोलंदाजांचा घाम काढला. 251 चेंडूंमध्ये त्याने 104 धावा केल्या. यामध्ये त्याने 15 चौकार मारले. आज दिवसभर त्याने बॅटींग करत शतक तर ठोकलंच त्यासोबतच 2013 नंतर भारतामध्ये पहिल्या दिवशी दिवसभर फलंदाजी करणार तो दुसरा बॅट्समन ठरला आहे.

याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या दिनेश चंदिमलच्या नावावर होता. 2017 मध्ये दिनेश चंदिमल याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दिवसभर फलंदाजी केली होती. 25 धावांवर सुरूवात केलेल्या तिसऱ्या दिवशी त्याने नाबाद 147 धावा केल्या होत्या. तर आज ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या उस्मान ख्वाजाने 104 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला. संघाची एक बाजू पहिल्या दिवसाच्या शेवटपर्यंत त्याने लावून धरली होती. दरम्यान, भारताकडून मोहम्मद शमीने दोन, रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनने 1 विकेट घेतली.

दोन्ही संघाचे खेळाडू टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.