IND vs AUS | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेत स्टार बॉलरचा मोठा रेकॉर्ड
पहिला एकदिवसीय सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मात्र एका गोलंदाजाने रेकॉर्ड केलाय.
विशाखापट्टणम | टीम इंडियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 10 विकेट्सने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. टीम इंडियाने विजयााठी दिलेलं 117 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता अवघ्या 11 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क या तिकडीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने अनुक्रमे नाबाद 51 आणि 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याआधी मिचेल स्टार्क याने 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. यासह मिचेल स्टार्क याने मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
स्टार्क याने 8 ओव्हरमध्ये 53 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने 1 मेडन ओव्हर टाकली. स्टार्कने कॅप्टन रोहित शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज या 5 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
यासह स्टार्कने भारतात दुसऱ्यांदा आणि एकूण 9 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. यासह स्टार्क याने श्रीलंकेचा दिग्गज यॉर्कर किंग लसिथ मलिंगा याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
मलिंगा याच्या नावावर वनडेमध्ये 8 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम होता. हा रेकॉर्ड ब्रेक करत स्टार्क याने मलिंगाला पछाडलं आहे. तसेच स्टार्क याने ब्रेट ली आणि शाहिद आफ्रिदीच्या 9 विकेट्सची बरोबरी केली आहे.
वनडेत सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारे गोलंदाज
वकार यूनिस | 13 मुथैय्या मुरलीथरन | 10 मिचेल स्टार्क | 9 ब्रेट ली | 9 शाहिद आफ्रिदी | 9 लसिथ मलिंगा | 8
तिसरा सामना निर्णायक
दरम्यान आता 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणारी टीम मालिका जिंकेल. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये या तिसऱ्या सामन्यात चांगलीच झुंज पाहायला मिळणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस स्टोयनिस, नाथन एलिस, सेन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.